मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची प्राथमिकता असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनाने वेग घेतला आहे. सत्तांतरानंतर राज्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ९४.३७ टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे बुलेट ट्रेनच्या एकूण भूसंपादनाचा टक्का वधारला असून, या प्रकल्पाचे भूसंपादन ९७.४७ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण रखडले होते. सत्तांतर झाल्यावर नव्या सरकारने मेट्रो आणि बुलेट ट्रेन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या.

खैरेंचा अगोदर सत्कार, संजय शिरसाट चिडले मंच सोडून निघाले, अखेर इम्तियाज जलीलांनी मार्ग काढला

राज्यातील वन विभागाच्या अखत्यारीत असलेली जागा बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे सादर केला होता. हा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण विभागाने मंजूर केला आहे. यानुसार ९५ हेक्टर जमिनीवर बुलेट ट्रेनचे काम करण्यास मुभा असणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी राज्यातील एकूण ४३३.८२ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. यापैकी ४०७ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण होत आहे, असे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या (एनएचएसआरसीएल)अधिकाऱ्यानी सांगितले.

दादरा-नगर हवेलीमधील १०० टक्के, गुजरातमध्ये ९८.८ टक्के आणि राज्यात ९४.३७ टक्के जमीन संपादित झालेली आहे. बुलेट ट्रेनसाठी या तीन राज्यांतील एकूण १,३९६ हेक्टर जमीन आवश्यक असून, यापैकी ९७.४७ टक्के अर्थात १,३५४ हेक्टर जमिन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, अशी माहिती ‘एनएचएसआरसीएल’ने दिली.

पुणे दौऱ्याची उलट सुलट चर्चा, सुरेश भटांच्या ओळींचा सहारा, तानाजी सावंतांची भूमिका अखेर समोर

सत्तेत आल्यानंतर लगेचच शिंदे सरकारने देशातील पहिल्या हायस्पीड ट्रेनसाठी (बुलेट ट्रेन) सर्व प्रकारच्या मंजुरी दिल्या होत्या. ‘एनएचएसआरसीएल’ने जुलैमध्ये वांद्रे-कुर्ला संकुलात भूमिगत टर्मिनस बांधण्यासाठी निविदा काढली. २१ ऑक्टोबरला ही निविदा उघण्यात येणार आहे.

सप्टेंबरमध्ये बीकेसी जमिनीचा ताबा

वांद्रे-कुर्ला संकुलातील बुलेट टर्मिनस उभारण्यासाठी आवश्यक जागेचे हस्तांतरण सप्टेंबरपर्यंत करण्यात येणार आहे, असे आश्वासन राज्य सरकारने दिल्याचे ‘एनएचएसआरसीएल’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जमीन नसल्याने आधीची निविदा रद्द

बीकेसी येथे स्थानक बांधण्यासाठी नोव्हेंबर २०१९मध्ये निविदा काढण्यात आली होती. त्यावेळी महाविकास आघाडी सरकार सत्तेत होते. बीकेसीची जमीन ‘एमएमआरडीए’ने ‘एनएचआरसीएल’कडे हस्तांतरित न केल्यामुळे फेब्रुवारीमध्ये निविदा रद्द करण्यात आली होती.

असे असेल बुलेट स्थानक

– बीकेसीच्या या भूमिगत स्थानकात सहा फलाट असतील

– प्रत्येक फलाट १६ डब्यांचा असून, फलाटाची लांबी ४२५ मीटर असेल

– रस्ते आणि मेट्रोने स्थानक जोडणार

– फलाट जमिनीपासून सुमारे २४ मीटर खाली

– मेट्रो २ ब मार्गावरील एका स्थानकाची जोड

– स्थानकात ये-जा करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here