मुंबई : मुंबई महापालिकेच्या कार्यालयांतील बायोमेट्रिक मशिनच्या बिघाडाचा फटका कर्मचाऱ्यांना बसला आहे. मशिन सातत्याने बंद पडत असल्याने कर्मचाऱ्यांच्या हजेरीची नोंद यंत्रणेत होत नाही. त्यामुळे असंख्य कर्मचाऱ्यांच्या पगाराची मोठी रक्कम कापली जात असल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर वेतन कापले जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

सदोष मशिनमुळे अनेक कामगारांचे २० ते २५ हजार रुपये वेतनातून कापण्यात आले आहेत. तर काही कर्मचाऱ्यांना शून्य पगार आला आहे. काम करूनही सदोष बायोमेट्रिक मशिनमुळे कामगारांच्या रजा नोंद होऊन कामगारांचे हजारो रुपये कापले जात आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करण्यात येऊ नये, पूर्वीप्रमाणेच मस्टरवर हजेरी लावावी अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी केली आहे.

मुंबईत चिंतामणी मिरवणुकीत चेंगराचेंगरी; गर्दीचा गैरफायदा घेत मुली-महिला आणि पोलिसांना त्रास देण्याचा प्रयत्न

बायोमेट्रिकची हजेरी पगाराशी जोडली जाऊ नये. प्रशासनाने याबाबत चर्चा करून मार्ग काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा संघटनेने दिला आहे. गणपती सण लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना पगार द्यावा, अशी मागणीही संघटनेचे सरचिटणीस वामन काविस्कर यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्याकडे केली आहे. या मागणीवर शर्मा सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील सत्तांतरानंतर वेगवान घडामोडी; मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत मोठी बातमी

बायोमेट्रिक मशिन तुटपुंज्या

पालिकेच्या कार्यालयात असलेल्या बायोमेट्रिक मशिन तुटपुंज्या असल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. २० कर्मचाऱ्यांच्या मागे एक मशिन असे आदेश प्रशासनाने काढले होते. प्रत्यक्षात ७० ते ८० कर्मचाऱ्यांसाठी सध्या एक मशिन उपलब्ध आहे. त्यामुळे बायोमेट्रिक मशिनवर हजेरी लावण्यासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ होते. अनेकदा मशिनला इंटरनेट कनेक्शन, तसेच सर्व्हर कनेक्टिव्हिटीही नसते, अशा तक्रारी कामगार संघटनांनी केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here