ncp jayant patil, सत्तेची फळे चाखली कुणी? राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांनी जयंत पाटलांना कोंडीत पकडलं – office bearers and workers asked party state president jayant patil questions about mahavikas aghadi government in the meeting of ncp
जळगाव : राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. सत्ताकाळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी तालुकाध्यक्षांसह कार्यकर्त्यांची कुठलीही कामे केली नाहीत. अडीच वर्षे सत्तेची फळे नेमकी चाखली कुणी, असा प्रश्न उपस्थित करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना शनिवारी कोंडीत पकडले.
प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत जळगावात पक्षाची आढावा बैठक झाली. त्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रश्नांचा भडिमार करीत तक्रारी मांडल्या. अडीच वर्षांत तालुकाध्यक्षांना कामांसाठी निधीही मिळाला नाही. मग सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जायचे कसे, कार्यकर्तेच दमदार नसतील, तर राष्ट्रवादीचे आमदार कसे निवडून येतील, असा प्रश्न तालुकाध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. त्यावर पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. विद्या चव्हाणांची टीका झोंबली, मोहित कंबोज यांचा सूचक इशारा
‘तुम्हाला जे खोदायचे ते खोदा’
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनीही मनातली खदखद व्यक्त करत, मी जेलमध्ये जाणार असल्याच्या रोज तारखा दिल्या जात आहेत. आता सीबीआयने चौकशी सुरू केली असून, हे बदनामी करण्याचे षडयंत्र आहे. तुम्हाला जे करायचे आहे ते करा, काय खोदायचे ते खोदा, असे म्हणत विरोधकांना आव्हान दिले.
‘५० खोके, एकदम ओके’चा ‘टी शर्ट’द्वारे प्रचाराचा निर्णय
राज्याच्या राजकारणात ‘५० खोके, एकदम ओके’ या सत्ताधाऱ्यांविरोधातील महाविकास आघाडीच्या घोषणेने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आता याच घोषणेचे ‘टी शर्ट’ वाटून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीकडून प्रचार करण्यात येणार आहे. शनिवारी जळगावात झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी केलेल्या सूचनेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मान्यता दिली.
To the esy.es Administrator, very same in this article: Link Text