पुणे : आपला समाज कुठल्या विकृतीकडे वाटचाल करत आहे याचा विचार न केलेला बरा. आतापर्यंत बलात्काराच्या अनेक घटना समोर आलेल्या आपण पहिल्या आहेत. मात्र, एका कुत्र्यावर अत्याचार झाल्याचा घाणेरडा प्रकार कधी ऐकलंय का? नाही ना पण अशी एक घटना पुण्याच्या खेड तालुक्यातून समोर आली आहे.

यापेक्षा विशेष बाब म्हणजे हा अत्याचार करतानाचे व्हिडीओ देखील संबंधित व्यक्तींनी आपल्या मोबाइलमध्ये काढले आहेत. या प्रकरणी एका ६५ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकाच खळबळ उडाली आहे. भिवसेन धोंडीबा टाकळकर रा. टाकळकरवाडी ता. खेड असे या विकृताचे नाव आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी या विकृताला अटक केली आहे.

सत्तेची फळे चाखली कुणी? राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांनी जयंत पाटलांना कोंडीत पकडलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील टाकळकरवाडी गावात येथे भिवसेन टाकळकर राहतात. या व्यक्तीने राहत्या घरात पाळलेली कुत्रीस खायचे आमिष दाखवून घरामध्ये घेऊन तिच्यावर अनेकदा अनैसर्गिक अत्याचार केल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. हा सगळा प्रकारचा स्थानिक युवकांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले आहे.

याबाबत एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने प्राणी मित्रांनी खेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी आयपीसी कलम ३७७ (अप्राकृतिक गुन्हे) आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक नवनाथ रानगट करत आहे.

अशा प्रकारची एक घटना पुणे शहरातील येरवडा परिसरात देखील दोन दिवसांपूर्वी घडली होती. त्याने रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचे समोर आले होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पहायला मिळत आहे. त्यामुळे विकृती कुठल्या स्तराला चालली आहे, हे या घटनांवरून समोर येत आहे.
Chandrakant Patil : कोल्हापुरात चंद्रकांतदादांचा करिष्मा, काँग्रेस नेत्याच्या हाती कमळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here