Maharashtra Politics | अमित शाह हे ५ सप्टेंबर रोजी मुंबईत येतील. यावेळी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अमित शाह आणि भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी गणरायाच्या दर्शनाला जाणार आहेत. अमित शाह यांचा मुंबई दौरा अत्यंत निर्णयाक ठरण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्याच्यादृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरु शकतो.

हायलाइट्स:
- यंदाच्या वर्षाच्या अखेरीस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे
- ही निवडणूक शिवसेना आणि भाजप यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची
- १५ आणि १६ डिसेंबरला जे.पी. नड्डा यांचा मुंबई दौरा
अमित शाह हे ५ सप्टेंबर रोजी मुंबईत येतील. यावेळी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अमित शाह आणि भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी गणरायाच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यानंतर आपल्या दरवर्षीच्या शिरस्त्याप्रमाणे अमित शाह हे मुंबईतील प्रसिद्ध लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेणार आहेत. अमित शाह २०१७ साली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. तेव्हापासून अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनाला न चुकता येतात. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये कोविडमुळे अमित शाह यांना लालबागच्या राजाचे दर्शन घेता आले नव्हते. मात्र, यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने अमित शाह लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला येणार आहेत. यंदाच्या वर्षाच्या अखेरीस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. ही निवडणूक शिवसेना आणि भाजप यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा गणेशोत्सवाच्या काळातील गणपती दौरा हा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अमित शाह यांच्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हेदेखील मुंबईत येणार आहेत. १५ आणि १६ डिसेंबरला जे.पी. नड्डा यांचा मुंबई दौरा असेल.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अमित शाह हे पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत आहेत. काही दिवसांपूर्वी अमित शाह नाशिक दौऱ्यावर येणार होते. परंतु, त्याचवेळी एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील आमदारांना घेऊन नॉट रिचेबल झाले होते. त्यामुळे आता अमित शाह मुंबई दौऱ्यात नेमकं काय करणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.