मुंबई: चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान सिनेमात दिसणार होता. बऱ्याच दिवसांनी आमिर खान आणि करिना कपूरची जोडी बघायला मिळणार होती. वेगळा विषय सिनेमातून उलगडणार होता. जोरदार प्रमोशन, चर्चा होऊनही लाल सिंह चढ्ढा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. सिनेमाच्या निर्मात्यांना या सिनेमाने आर्थिक फटका बसला असला तरी आमिर खानसह करिना कपूर, नागा चैतन्य, मोना सिंह यांना मात्र तगडं मानधन मिळालं आहे. आमिरच्या खिशात तर सिनेमाची सगळी कमाईच आली आहे.
सीझन ४ फुल टू राडा … बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोनं वाढवली उत्सुकता
खरं तर लाल सिंह चढ्ढा ही आमिर खानची एक महत्त्वाकांक्षी सिनेमा होता. यासाठी त्याने खूप मेहनत घेतली होती. हॉलिवूडपट फॉरेस्ट गंप या सिनेमाचा रिमेक होता पण त्याला भारतीय टच देण्यावर खूप काम झालं होतं. आमिरने या सिनेमाच्या निर्मितीतही सहभाग घेतला होताच पण त्याने मुख्य भूमिकेसाठी मानधनही घेतलं आहे.

आमिर खान याने आजपर्यंत केलेली वादग्रस्त विधाने, त्याच्या सिनेमाच्या काही दृष्यांमध्ये दाखवलेले वादग्रस्त सीन यामुळे आमिर खानच्या सिनेमावर बहिष्कार घालण्याची मोहीम सोशलमीडियावर सुरू झाली. बॉयकॉट ट्रेंडमुळे लाल सिंह चढ्ढा या सिनेमाला बॉक्स ऑफीसवर यश मिळालं नाही. १८० कोटींमध्ये बनवलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर कशीबशी ५० कोटींची कमाई केली आहे.

या सिनेमासाठी आमिर खान याने घेतलेल्या मानधनाचा आकडा ऐकाल तर धक्काच बसेल. कारण जितकी या सिनेमाची कमाई आहे तेवढे मानधन एकट्या आमिर खानचेच आहे. या सिनेमासाठी आमिरने ५० कोटी रूपये मानधन घेतलं आहे. तर करिना कपूर हिची या सिनेमात छोटी पण महत्वाची भूमिका आहे. तिने या सिनेमासाठी ८ कोटी रूपये घेतले आहेत.

साउथचा सुपरस्टार नागा चैतन्य याने या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली पण त्याला मात्र पहिल्याच बॉलिवूडपटात फ्लॉपचा शिक्का सहन करावा लागला. नागा चैतन्यला या सिनेमासाठी ६ कोटी रूपये मानधन देण्यात आलं आहे. मोना सिंहने या सिनेमात आमिर खानच्या आईची भूमिका केली आहे. तिला यासाठी २ कोटी रूपये मानधन मिळालं आहे.
आजही ताज हॉटेलमध्ये जायचं धाडस होत नाही? हेमांगी कवीची पोस्ट वाचून मिळेल उत्तर

लाल सिंह चढ्ढा या सिनेमाची कमाई झालीय ५० कोटी. खर्च आलाय १८० कोटी. हे गणित बघता आमिर सोडून इतर कलाकारांच्या मानधनावर निर्मात्यांचे १६ कोटी रूपये खर्च झालेत. साहजिकच या सिनेमाच्या फ्लॉपमुळे निर्मात्यांचं प्रचंड नुकसान झालंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here