जालना : विजेच्या स्पर्शाने पोळ्याच्या दिवशी मृत झालेल्या गायींचे गावातील महिलांनी औक्षण करून त्यांना ७०० ते ८०० साड्या नेसवून दिला भावपूर्ण निरोप दिला. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात असलेल्या आंबा गावातील ग्रामस्थांनी साश्रू नयनांनी त्या मृत गायींना निरोप दिला. पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेतात विजेचा धक्का लागून २६ ऑगस्टला ६ गायी आणि ४ वासरांचा जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील आंबा येथे मृत्यू झाला होता. भर पोळ्याच्या दिवशी झालेल्या या घटनेमुळे पोळा सण साजरा न करता गावकऱ्यांनी दुखवटा पाळला होता. त्या मृत गायींवर काल २७ ऑगस्ट रोजी साश्रूनयनांनी पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठले यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आला.

शिंदे-फडणवीस सरकार येताच अमित शाह सक्रिय, ५ सप्टेंबरला मुंबई दौरा, राजकीय हालचालींना वेग
या अंत्यविधीला आंबा गावातील ग्रामस्थ आणि महिलांची उपस्थिती होती. पोळ्याच्या दिवशी आंबा गावावर दुःखाचे सावट पसरले होते. या मृत गायींवर अंत्यसंस्कार करताना आंबा गावाच्या महिला भगिनींनी अक्षरशः हंबरडा फोडला. विशेष म्हणजे गावातील प्रत्येक महिलांनी या मृत गायींचे औक्षण करून त्यांना ७०० ते ८०० साड्या नेसवून निरोप दिला. यावेळी साड्यांचा मोठा खच साचलेला दिसत होता. गावातील श्रद्धास्थान असलेल्या बागेश्वरी मातेला गाय सोडण्याची येथील परंपरा आहे.

देवीला सोडलेल्या तब्बल १९ गायी आणि ६ वासराला गावातून प्रत्येक घरातून चारा, अन्न पुरवले जायचे. यातील ६ गायी आणि ४ वासरांचा भर पोळ्यात झालेल्या मृत्यूमुळे गावात प्रत्येकजण दुःख व्यक्त करत होता. काल संपूर्ण गावकऱ्यांनी जणू काही आपल्याच घरातील कुणी व्यक्ती गेला, असे समजून या अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती.

ऐन पोळा सणाच्या दिवशी मन हेलावून टाकणाऱ्या घटनेला जबाबदार असलेल्या आणि अनधिकृतपणे तार लावून त्यात वीजप्रवाह सोडणाऱ्यावर रात्री गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली. निष्काळजीपणामुळे गायींचा मृत्यू झाल्यामुळे त्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Nashik : नाशिकमध्ये मोठी घटना; सैनिकी क्षेत्राच्या हवाई हद्दीत ड्रोन उडवला, गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here