Maharashtra Politics | काही दिवसांपूर्वीच पुण्यातील एका गणेश मंडळाच्या देखाव्यावरुन वाद निर्माण झाला होता. अफजलखान वधाच्या देखाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे राजकीय पक्ष आक्रमक झाले होते. पुण्यातील नरेंद्र मित्र मंडळाने राज्यातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर हा देखावा साकारला होता. हा देखावाही सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे.

हायलाइट्स:
- पुण्यातील आणखी एक देखावा वादग्रस्त
- परवानगी नाकारल्यानंतर संबंधित मंडळानेही माघार घेतली
- गणेशोत्सवापूर्वीच या देखाव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे
पुण्यातील नरेंद्र मित्र मंडळाने राज्यातील सत्तांतराच्या (Maharashtra Politics) पार्श्वभूमीवर हा देखावा साकारला होता. ‘सत्ताधाऱ्यांचे समुद्रमंथन आणि कार्यकर्त्यांचे मरण’ या नावाने सादर होणाऱ्या देखाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे समोरासमोर दाखवण्यात आले आहे. हे दोघे सत्तेचे समुद्रमंथन करताना दाखवण्यात आले होते. या सगळ्यात सामान्य जनतेचे कशाप्रकारे मरण होत आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न होता. मात्र, या देखाव्यावरून वाद निर्माण होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी या देखाव्याला परवानगी नाकारली.
पोलिसांनी शेवटच्या क्षणी देखाव्याला परवानगी नाकारल्याने मंडळाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या देखाव्यातून कोणत्याही प्रकारचा राजकीय रंग देण्याचा आमचा हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण मंडळाने दिले आहे. पण शांतता आणि सुव्यवस्थेच्या कारणावरून पोलिसांनी ही परवानगी नाकारली असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांचा मोठा निर्णय
पुढील वर्षीचा म्हणजे सन २०२३मधील गणेशोत्सव काश्मीरमधील जिल्ह्यांमध्ये साजरा करण्याचा निर्णय शनिवारी मानाच्या गणपतींतर्फे जाहीर करण्यात आला. मात्र, या निर्णयाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने (Dagdusheth Halwai Ganpati) विरोध दर्शवला असून, या निर्णयाला कोणताही पाठिंबा नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. या घोषणेमुळे पुण्यात उत्सवाच्या तोंडावर सुरक्षेविषयी धोका निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका ट्रस्टकडून मांडण्यात आली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Ahaa, its good discussion about this paragraph at this place at
this web site, I have read all that, so now me also commenting at
this place. https://leroiduplancher.com/porcelaine-et-la-ceramique/