मुंबई : मराठी रंगभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर, आशयावर आधारीत नाटकं सातत्यानं येत आहेत. या नाटकांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसादही मिळत आहे. काही जुनी नाटके आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. असंच एक नाटक म्हणजे चारचौघी. प्रशांत दळवी लिखीत या नाटकानं मराठी रंगभूमीवर इतिहास रचला होता. या नाटकाचं दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलं होतं. हे नाटक आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. आता हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर नव्या संचात येत आहे. ही बातमी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर सातत्यानं मुक्ता या नाटकासंदर्भातील वेगवेगळ्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत आहे.

हे वाचा-असं कोण वागतं यार.. कुशल बद्रिकेला पत्नीचं हे वागणं अजिबात आवडत नाही

या चौघींच्या अभिनयाची दिसणार जुगलबंदी

मुक्तानं चारचौघी नाटकाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये चारचौघी नाटकात त्या चौघीजणी कोण असणार याची माहिती तिनं दिली आहे. या नाटकात रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे आणि मुक्ता बर्वे यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. तसंच या चौघींना साथ देणारे ते ‘तिघे’ कोण असा प्रश्नही विचारला आहे. या नाटकामध्ये मुक्ता देखील काम करत आहे. प्रदीर्घ काळानंतर ती पुन्हा एकदा रंगभूमीवर दिसणार असल्यानं चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.


अजरामर नाटक

१५ ऑगस्ट १९९१ रोजी म्हणजे बरोब्बर ३१ वर्षांपूर्वी रंगभूमीवर ‘चारचौघी’ हे नाटक रंगभूमीवर आलं होतं. प्रशांत दळवी यांनी लिहिलेल्या त्या नाटकात वंदना गुप्ते, आसावरी जोशी, प्रतीक्षा लोणकर आणि दीपा श्रीराम यांच्या मुख्य भूमिका होत्या.

हे वाचा-ताज हॉटेलमध्ये जाण्याचं आजही धाडस होत नाही? हेमांगी कवीची पोस्ट वाचून मिळेल उत्तर

एका अत्यंत महत्त्वाच्या विषयवार भाष्य करणारं आणि स्त्रियांची मतं, त्यांचे निर्णय याबद्दल सखोल दर्शन घडवणारं हे नाटक त्याकाळी बरंच गाजलं होतं. एकतर असा विषय रंगभूमीवर येणं ही गरज या नाटकाने पूर्ण केली. आता हेच नाटक तब्बल एकतीस वर्षांनी एका नव्या संचात बघायला मिळणार आहे.

चारचौघी

मुक्तानं आजपर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आता या अजरामर आणि महत्त्वाच्या अशा नाटकात मुक्ता भूमिका करणार असल्यानं तिला पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here