twin tower noida demolition reason, Noida Twin Tower : धडामधूम… १२ सेकंदात ३०० कोटी उद्ध्वस्त, नोएडातील ३२ मजल्यांचा ट्विन टॉवर जमीनदोस्त, पाहा व्हिडिओ – noida twin tower building demolished by blast today as per orders of court
नोएडा : गेल्या आठ दिवसांपासून ज्या नोएडा सुपरटेक ‘ट्विन टॉवर’ चर्चा सुरू होती. आता ते टॉवर इतिहासजमा झाला आहे. ट्विन टॉवर अवघ्या १२ सेकंदात जमीनदोस्त झाला आहे. काही मिनीटांपूर्वी म्हणजे २ वाजून ३२ मिनीटांनी टॉवर पाडण्यात आला आहे. १२ सेकंदात ३०० कोटी उद्धवस्त झाले आहेत. तर टॉवर पाडल्याने आजूबाजूच्या परिसरात धुळीचं साम्राज्य निर्माण झाले होते. दरम्यान, दोन्ही इमारतींच्या परिसरात जवळपास ७ हजार लोकं राहतात. मात्र, टाॅवर पाडण्यापूर्वी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते.
एपेक्स आणि सायन टॉवर्सभोवती १०० मीटरचा बहिष्कार झोन तयार करण्यात आला आहे. या झोनमध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. झोनच्या बाहेर फक्त सहा लोकांनाच परवानगी असेल. त्यात जेट डिमॉलिशनचे संचालक जो ब्रिकमॅन सामील होणार आहेत. त्यांनीच या स्फोटाला डिझाइन केलं आहे. त्यांच्यासोबत दोन तज्ञ, एडिफिस इंजिनीअरिंगचे अधिकारी, एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि भारतीय ब्लास्टर चेतन दत्ता असतील.