सोनाली यांचं निधन हार्टअटॅकमुळं झाल्याचं सुरुवातीला म्हटलं गेलं. परंतु हा मृत्यू नैसर्गिक नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. कट रचून सोनाली यांचा खून केला गेल्याचं आता समोर आलं आहे. सोनाली यांच्या कुटुंबियांनी देखील आता सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
सोनाली यांची मैत्रिण आणि बिग बॉसमधील स्पर्धक अर्शी खान हिनं देखील आता सोनालींबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत.
काय म्हणाली अर्शी खान?
आम्ही दोघी बिग बॉसनंतरही संपर्कात होतो. ती माझी नेहमीच विचारपूस करायची. तिनं माझे लाडही केलेत. मला नेहमी म्हणयाची की तुझं वय वाढलंय, पण वागणं अगदी लहानमुलांसारखं आहे, असं म्हणत अर्शीनं सोनालींसोबतच्या आठवणी शेअर केल्या. आजकाल आमच्यात फार बोलणं होतं नव्हतं. पण माझ्या आयुष्यातील एका जवळच्या व्यक्तीला मी गमावल्यासारखं वाटतं असल्याचंही अर्शी म्हणाली.
सोनाली माणूस म्हणूनही खूप चांगली होती. पैशांसाठी तिला मारलं असेल तर, हे खूप वाईट झालं. तिला पैसे मागितले असते, तर तिनं सहज दिले असते. यासाठी तिचा जीव नव्हता घ्यायला पाहिजे त्यांनी, असं म्हणत अर्शीनं आरोपींना शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. आता समोर आलेले व्हिडिओ पाहून मला धक्काच बसला आहे. मला आता भीती वाटू लागलीय, असंही ती म्हणाली.