India vs Pakistan Asia Cup: आशिया कपमध्ये आज भारताचा सामना पाकिस्तानशी होईल. दुबईमध्ये हा सामना होत आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी भारताकडे आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सामना सुरू होईल.

भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा संघ काळ्या फिती बांधून मैदानात उतरेल. पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून पुराचा कहर पाहायला मिळत आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये भीषण परिस्थिती आहे. या पुरात जीव गमावलेल्यांच्या स्मरणार्थ पाकिस्तानी संघातील खेळाडू काळ्या फिती लावून खेळतील. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
Ind vs pak: बच के रहेना रे बाबा… या ५ पाकिस्तानी खेळाडूंमध्ये सामना फिरवण्याची ताकद, भारताला धोका
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानंदेखील याबद्दल माहिती दिली आहे. ‘पाकिस्तानी क्रिकेट संघ आशिया कपमध्ये आज आपला पहिला सामना भारताविरोधात खेळेल. या सामन्यात पाकिस्तानी संघ काळी फित बांधून उतरेल. पाकिस्तानातील पूरग्रस्तांना पाठिंबा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे,’ असं पीसीबीनं म्हटलं आहे.

पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमनं काल पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यानं देशातील परिस्थितीचा उल्लेख केला. पूरग्रस्तांना मदत करण्याचं, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन आझमनं केलं. आमचा देश अवघड परिस्थितीतून जात आहे. आम्ही सगळेच पूरग्रस्तांसाठी प्रार्थना करत आहोत, असं आझम म्हणाला होता.
पाकिस्तानी पत्रकाराने रोहितला विचारला अनपेक्षित प्रश्न; हिटमॅनच्या उत्तराने सर्वांची बोलती बंद
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातील बहुतांश भागांमध्ये पूर आला आहे. याचा फटका ३ कोटींहून अधिक नागरिकांना बसला आहे. तीन प्रांतांमधील परिस्थितीत अत्यंत भीषण आहे. या पुरात आतापर्यंत १ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here