सांगली : अपहरण करून हत्या करण्यात आलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. सांगली पोलिसांनी माणिकराव पाटील यांच्या हत्या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. संशयित आरोपींनी आर्थिक तंगीमुळे अपहरण करून ही हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक माणिक पाटील यांचे १३ ऑगस्ट २०२२ रोजी मिरज तालुक्यातील तुंग येथुन अपहरण करत हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. कवठेपिरान नजीकच्या वारणा नदीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. जमीन दाखवण्याच्या बहाण्याने त्यांना तुंग येथे बोलवून अपहरण करून हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक तपासत निष्पन्न झाल्या होते.

ट्विन टॉवर जमीनदोस्त! गुंतवणूक किती? सध्याची किंमत काय होती? पाडायला किती खर्च? जाणून घ्या
मात्र, ही हत्या नेमक कोणी आणि कोणत्या कारणातून अपहरण करत हत्या केली. हे पोलिसांच्या समोर मोठं आव्हान होतं. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सांगली ग्रामीण पोलिसांकडून तपास करत हत्येचा छडा लावण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. किरण रणदिवे (वय २६), अनिकेत ऊर्फ निलेश दुधारकर (वय २२) आणि अभिजित चंद्रकांत कणसे (वय २०) सर्व राहणार कारंदवाडी, तालुका वाळवा असे नावे आहेत.

या तिघांना आर्थिक अडचण होती त्यातून कुणाचे तरी अपहरण करायचे आणि पैसे मिळवायचे यातून त्यांनी माणिकराव पाटील या बांधकाम व्यवसायिकाचे अपहरण करायचे ठरवले. त्यानुसार तिघांनी माणिकराव पाटील यांना तुंग येथे बोलवून घेत अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माणिकराव पाटलांनी आरडाओरडा सुरू केली. त्यातून तिघांनी माणिकराव पाटील यांना मारहाण करत तोंड दाबले त्यामुळे माणिकराव पाटील बेशुद्ध झाले होते.

त्यानंतर तिघांनी माणिकराव पाटील यांना गाडीच्या डीक्कीत टाकून तिथून पलायन केलं. त्यानंतर या आरोपींनी माणिकराव पाटील शुद्धीवर आल्यावर त्यांच्या घरच्यांच्याकडून पैसे उकळण्याचे ठरवलं. मात्र, माणिकराव पाटील शुद्धीत आले नाहीत त्यामुळे तिघांनाही माणिकराव पाटील यांचा मृत्यू झाल्याचं वाटलं. त्यानंतर माणिकराव पाटलांचे हातपाय बांधून त्यांना वारणा नदी पात्रामध्ये फेकण्यात आल्याची कबुली तिघा संशयितांनी दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.

Ind vs pak: बच के रहेना रे बाबा… या ५ पाकिस्तानी खेळाडूंमध्ये सामना फिरवण्याची ताकद, भारताला धोका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here