गावोगावी जाऊन धान्य विक्री करणाऱ्या तरुणाची रिक्षा रस्त्यात बंद पडली. बंद रिक्षाला भरधाव वाहनाने धडक दिली. या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. धरणगाव चोपडा रोडवरील कमल जिनिंगजवळ रविवारी सकाळी ही घटना घडली आहे.

चार बहिणींचा एकुलता एक भाऊ
आशिषचे पितृछत्र बालपणीच हरवलेले होते. तो चार बहिणींचा एकुलता एक भाऊ असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. आशिष मितभाषी आणि सर्वांमध्ये मिळून मिसळून राहायचा. तो प्रचंड कष्टाळू होता. त्यामुळे या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.