मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृत तरुणाची पँट कमरेच्या खाली पायापर्यंत आल्याचं पोलिसांना दिसून आलं. तरुणानं हिरवा शर्ट घातला होता. त्याची बटणं उघडी होती. मृत तरुणाच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. पोलिसांनी तरुणाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला. मृत तरुण त्याच गावचा रहिवासी असल्याचं तपासातून समोर आलं.
मुलगा रात्रभर बेपत्ता होता आणि त्याचा मोबाईल बंद होता, अशी माहिती मृताच्या वडिलांनी पोलिसांना दिली. आम्ही रात्रभर त्याचा शोध घेतला. मात्र त्याचा ठावठिकाणा समजला नाही, असं वडिलांनी सांगितलं. मृत तरुण गावातील एका व्यक्तीकडे ट्रॅक्टर चालवायचा. त्यांच्या घरी तरुणाची ये-जा असायची. रात्री तो घरातून निघाला. मात्र घरी परतला नाही.
तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर पोलीस ट्रॅक्टर मालकाच्या घरी गेले. मालकाच्या मुलीचा कालच्या रात्री मृत्यू झाल्याचं त्यावेळी पोलिसांना समजलं. तिचा मृतदेह घराजवळच पुरण्यात आला होता. त्यानंतर तिचं संपूर्ण कुटुंब फरार झालं होतं. मृत तरुणाचे मालकाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. तरुणीच्या कुटुंबीयांनी दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. त्यानंतर त्यांनी दोघांची हत्या केली आणि फरार झाले.