सोलापूर रेल्वे स्थानकात थांबलेल्या मालगाडीवर चढून सेल्फी घेत असताना विद्युत तारेचा शॉक बसल्याने १७ वर्षांचा तरुण भाजून गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना बंद असलेल्या कॅबिनजवळ रविवारी २८ ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास घडली.

रेल्वे स्थानकातील बाळेच्या दिशेकडील कॅबिनजवळ एका थांबलेल्या मालगाडीवर चढून मोबाईलने सेल्फी घेत होता. याचवेळी विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने तो भाजला आणि खाली कोसळला. यावेळी त्याच्या अंगावरील सर्व कपडे जळून गेले. त्याला गंभीर अवस्थेत रेल्वे पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमी जमादार हा अकरावी इयत्तेत शिकत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी
मूकसित जमादार यास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रेल्वे इंजिनवर चढून सेल्फी घेताना अपघात झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. जखमी तरुणाचे नातेवाईक व मित्रमंडळी यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकच गर्दी केली होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.