२५ वर्ष शिवसेनेने एकाच पक्षाच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवली होती. मात्र, केसाने गळा कापण्याचे काम भाजपने केले. संभाजी ब्रिगेडप्रमाणे महाराष्ट्रातील इतर पक्षांसोबत शिवसेनेने युती करायला करायला पाहिजे, असंही भास्कर जाधव म्हणाले.
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीवर खोचक भाष्य करणाऱ्या फडणवीसांनाही भास्कर जाधवांना प्रत्युत्तर दिलं. आम्हाला विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणणाऱ्या फडणवीस यांच्या पक्षाने आजवर अनेकांशी युती केली आणि दगा दिला. शिवसेना मात्र, एकासोबतच कायम राहिली, असा टोला भास्कर जाधवांनी लगावला.
भास्कर जाधव, अरविंद सावंतांना प्रमोशन
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पडझड झालेला शिवसेनेचा किल्ला आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा बांधायला सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील अनेक प्रमुख पदाधिकारी बाहेर पडले होते. त्यामुळे संबंधित नेत्यांची पदे रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून आता राज्यभरात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच तीन महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत शेवटपर्यंत राहणारे अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांना प्रमोशन मिळाले आहे. तर शिवसेनेचे बुजुर्ग नेते लीलाधर डाके यांच्या मुलावर उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे