ठाण्यातील एका अल्पवयीन मुलीवर भिवंडीमध्ये सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी तिघांना अटक केली

 

rape-2
म. टा. प्रतिनिधी, ठाणेः ठाण्यातील एका अल्पवयीन मुलीवर भिवंडीमध्ये सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी तिघांना अटक केली. आरोपींनी या मुलीला मारहाण केली. तिला चावादेखील घेतला आहे. यातील एका आरोपीबरोबर मुलीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती, अशी माहिती समोर आली. तीनही आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे परिसरात राहणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलीचे वय १६ वर्षे असून ती बारावीमध्ये आहे. २६ ऑगस्ट रोजी दुपारी भिवंडीतील काल्हेर येथील एका इमारतीमध्ये या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. मुलीने विरोध केल्यानंतर दोन आरोपींनी तिला मारहाण केली. तर अन्य एका आरोपीने तिला चावा घेतला. हा प्रकार कोणाला न सांगण्याबाबत धमकीही दिली. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर तिघांविरुद्ध सुरुवातीला चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. नंतर हा गुन्हा नारपोली पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. आरोपींचे वय २१, २२ आणि ३५ वर्षे असून तिघेही ठाण्यातच राहतात. यातील दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या वागळे युनिटने पकडले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here