गावातील चैतन्य चव्हाण, भारत गाडेकर, मुंजाजी चव्हाण, उत्तम चव्हाण यांनी विहिरीत उतरुन लवचा शोध घेतला. तब्बल एक तास शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले होते. गावातील उद्धव पवार यांनी सदर घटनेची माहिती पोलीसांना दिली. पोलिस निरीक्षक सोमवंशी, उपनिरीक्षक पोलीस चव्हाण, बीटजमादार फड, मुलगीर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि त्यानंतर मृतदेह परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्याचे पार्थिव संबर येथे नेण्यात आले. या घटनेमुळे संबर गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
boy fall in well, गायीला चरायला घेऊन गेला तो परतलाच नाही; जुन्या विहिरीत डोकवायला गेला अन्… – in parbhani boy died after he fall in well
परभणी: गायीला चरायला घेऊन गेलेल्या एका १३ वर्षांच्या बालकाचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना परभणी तालुक्यातील संबर येथे घडली आहे. लव गजानन गायकवाड असे मयत बालकाचे नाव आहे. तब्बल एक तासाच्या अथक परिश्रमानंतर बालकाचा मूर्तदेह बाहेर काढण्यात आला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.