Shivsena vs Eknath Shinde | शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी आग्रह धरला जात आहे. मात्र, ४ ऑगस्टनंतर या प्रकरणाची सुनावणी झालेली नाही. अनेक लोकांनी देव पाण्यात बुडवले होते. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल, शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर आमचे सरकार कोसळेल, अशी आस अनेकजण लावून बसले आहेत. आपली तक्रार घटनापीठाकडे गेली आहे

 

Uddhav Thackeray Eknath Shinde
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • शेवटची सुनावणी ही ४ ऑगस्ट रोजी झाली होती
  • त्यानंतर ‘तारीख पे तारीख’ असा प्रकार सुरु आहे
  • शिवसेनेच्या गोटातील बैचेनी अगोदरच वाढली आहे
मुंबई: सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेला शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे ही कायदेशीर लढाई दीर्घकाळ चालेल. या प्रकरणाचा फैसला चार ते पाच वर्ष लांबेल, असे संकेत शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी दिले आहेत. तसेच शिवसेनेची (Shivsena) धनुष्यबाण ही निशाणी शिंदे गटालाच मिळेल, असा दावाही भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गोटातील चिंता वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे प्रकरणाची सुनावणी झालेली नाही. शेवटची सुनावणी ही ४ ऑगस्ट रोजी झाली होती. त्यानंतर ‘तारीख पे तारीख’ असा प्रकार सुरु आहे. या सगळ्यामुळे शिवसेनेच्या गोटातील बैचेनी अगोदरच वाढली आहे. भरत गोगावले यांच्या वक्तव्याने त्यामध्ये आणखी भर पडणार आहे.

भरत गोगावले यांनी रविवारी एका सभेत याबद्दल वक्तव्य केले. अनेक लोकांनी देव पाण्यात बुडवले होते. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल, शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर आमचे सरकार कोसळेल, अशी आस अनेकजण लावून बसले आहेत. पण तुम्हाला मी सांगतो की, आपली तक्रार घटनापीठाकडे गेली आहे. हे आता जवळजवळ चार ते पाच वर्षे चालणार आहे. दुसरी निवडणूक जिंकून आपण पुन्हा सत्तेत येऊ, असे भरत गोगावले यांनी म्हटले. राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
शिवसेनेच्या नादाला लागाल तर राजकीय जीवनाची राख होईल, नेतेपदी निवड होताच भास्कर जाधव कडाडले
सर्वोच्च न्यायालय शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवत नाही तोपर्यंत शिंदे-फडणवीस सरकार हे सुरळीत चालू राहील. शिंदे-फडणवीस यांच्याकडे सत्ता कायम राहिल्यास आगामी काळात शिवसेनेची आणखी पडझड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेकडून आपले वकील कपिल सिब्बल यांच्यामार्फत लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे आग्रह धरला जात आहे. या प्रकरणात अनेक घटनात्मक पेच आहेत. त्याचा निवाडा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्यात आले आहे. आता हे घटनापीठ कधी सुनावणी घेणार आणि काय निकाल देणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Shivsena: उद्धव ठाकरे यांना पुन्हा धक्का, शिवसेनेचे आणखी दोन आमदार फुटणार?
शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंनी वाचवला: गुलाबराव पाटील

दसरा मेळाव्यावरुन ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगताना दिसत आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेना नेतेपदी बढती दिलेल्या भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिंदे गटाला इशारा दिला होता. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष असून राजकीय अधिकारात कोणी हात टाकल्यास त्याचा राजकीय प्रवास भस्मसात होईल, असं जाधव म्हणाले होते, त्यावर आता पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना कोणाची आहे, यापेक्षा शिवसेना वाचवली कोणी, हे सर्वात महत्त्वाचे आहे. शिवसेना वाचवण्यासाठी सर्वात मोठे काम कोणी केले असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here