शनिवारी सकाळी वडिलांनी कुलदीपला फोन केला. मात्र त्याचा फोन स्विच्ड ऑफ होता. त्यामुळे वडिलांनी कुलदीपच्या घरमालकाला कॉल केला. आपण कामावर असून घरी जाऊन बघतो, असं घरमालकानं सांगितलं. संध्याकाळी घरमालक कुलदीपच्या खोलीबाहेर पोहोचले. दरवाजा आतून बंद होता. अनेकदा आवाज दिल्यानंतरही कुलदीपनं दरवाजा न उघडल्यानं घरमालकानं पोलिसांना बोलावलं.
कुलदीप सिहोर जिल्ह्यातील बिलकिसगंजचा रहिवासी होता. सध्या तो भोपाळमधील नीलबड परिसरात भाड्यानं राहात होता. कुलदीप खोलीचा दरवाजा उघडत नसल्याची माहिती शनिवारी संध्याकाळी ७ वाजता पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी त्यांना कुलदीप मृतावस्थेत आढळून आला. त्याचे हात विजेच्या तारेनं बांधलेले होते. कुलदीपनं आत्महत्या का केली यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कुलदीपच्या खोलीत कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. कुलदीपनं आधी स्वत:चे दोन्ही हात बांधले. त्यानंतर तारेचं दुसरं टोक प्लगमध्ये टाकून स्विच ऑन केला. त्यामुळे करंट लागून कुलदीपचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. कुलदीपच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.