मुंबई : अनेक घडामोडी आणि बातम्यांच्या आधारावर आज बाजारात कोणत्या शेअर्सकडे ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे. अशा शेअर्सची माहिती आपण घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, एनएचपीसी, सिप्ला आदी शेअर्सचा सामावेश असणार आहे.

अल्ट्राटेक सिमेंट
कंपनीने डल्ला सिमेंट वर्क्स, उत्तर प्रदेश येथे 1.3 mtpa ची सिमेंट निर्मिती क्षमता असलेला प्लॉंट कार्यान्वित केला आहे. ज्यामुळे युनिटची क्षमता 1.8 mtpa पर्यंत वाढली आहे.

एनटीपीसी (NTPC)
सरकारी वीज कंपनीच्या मंडळाने 1,320 मेगावॅट तालचर औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 11 हजार 843 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली.

शेअर बाजारातून १० नाही तर १०० पट परतावा मिळवा, फक्त ‘ही’ रणनीती लक्षात घ्या…

इंटरग्लोब ऐविएशन
कंपनीच्या भागधारकांनी तीन संचालकांच्या नियुक्तीला आणि अनिल पाराशर यांची संचालक म्हणून पुनर्नियुक्तीस मान्यता दिली.

खते उत्पादन कंपन्या
युरिया आणि डीएपीसह सर्व अनुदानित खते ऑक्टोबरपासून ‘भारत’ या सिंगल ब्रँड अंतर्गत विकली जातील.

TCS ला शेअर बाजारात १८ वर्षे पूर्ण, १ लाखाचे झाले ३० लाख रुपये

सिप्ला (Cipla)
सिप्ला कंपनीला त्यांच्या गोवा प्लांटमध्ये ऑगस्ट 2022 मध्ये केलेल्या तपासणीनंतर अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून (USFDA) सहा निरीक्षणे प्राप्त झाली आहेत. अमेरिकेच्या एफडीएकडून मिळालेल्या सूचनांवर तातडीने सुधारणा करण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले.

मॅक्स फायनान्शिएल सर्विसेस ( Max Financial Services)
अॅक्सिस बँक पुढील 6-9 महिन्यांत मॅक्स लाइफ इन्शुरन्समधील आपला हिस्सा सुमारे 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे, असे मॅक्स इन्शुरन्सच्या कंपनीचे सीईओ प्रशांत यांनी सांगितले.

राधाकिशन दमानींनी ‘या’ शेअरवर खेचला दमदार पैसा; एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
(बर्जर पेंट) Berger Paints India
कंपनी नोव्हेंबरमध्ये लखनऊजवळ पूर्णपणे स्वयंचलित पेंट्स निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्याचा विचार करत आहे. प्लांटमधील एकूण गुंतवणूक सुमारे 1,000 कोटी असेल.

मिंडा (Uno Minda)
ऑटो कंपोनंट्स निर्माती कंपनीने पुढील 4-5 वर्षात त्यांच्या आफ्टरमार्केट व्यवसायात 25 टक्क्यांहून अधिक वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

एनएचपीसी( NHPC)
सरकारी मालकीच्या हायड्रो पॉवर कंपनीने चंबा जिल्ह्यात 500 मेगावॅट दुगर जलविद्युत प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी हिमाचल प्रदेश सरकारसोबत एक करार केला.

RITES
रेल्वे कंपनीने कोल्लम रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी जे व्ही भागीदारासोबत दक्षिण रेल्वेकडून 361.18 कोटी रुपयांची नवीन ऑर्डर मिळविली आहे. ऑर्डरमध्ये RITES चा हिस्सा 51 टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here