दिवा-आगासन रोडवर साईबाबा नगर येथे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे आहेत. याच खड्ड्यांमुळे गणेश पाले या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत कामांच्या फक्त कागदावर घोषणा होत आहेत. पण कामं होत नाहीत.अजून किती बळी घेणार? असा सवाल उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे दिवा भाजपचे मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनीही ट्विट करत दिवा आगासन रोडवर अजून ठाणे महापालिका किती लोकांचे जीव जाण्याची वाट पाहत आहे? असा प्रश्न विचारला आहे. यापूर्वीही याच रस्त्यावर अपघात झाले आहेत. मात्र ठाणे महापालिकेचे अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. एकीकडे महापालिकेचे अधिकारी स्मार्ट सिटीचे पुरस्कार घेऊन आपली पाठ थोपटून घेत आहेत. मात्र रस्त्याच्या कामांकडे दुर्लक्ष करत आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.