Team India victory in Asia Cup | आशिया चषक स्पर्धेत भारताने रविवारी आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवर ५ गडी राखून मात केली. यानंतर देशभरात क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले आहे. पाकिस्तानने भारतापुढे विजयासाठी १४८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली आणि रोहित शर्मा मोक्याच्या क्षणी बाद झाले.

हायलाइट्स:
- हायव्होल्टेज मॅच पाहण्यासाठी भलीमोठी स्क्रीन
- शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगला होता
- पंड्याने षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला
भारत आणि पाकिस्तानची हायव्होल्टेज मॅच पाहण्यासाठी कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे भलीमोठी स्क्रीन लावण्यात आली होती. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगला होता. हार्दिक पंड्याने षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकच जल्लोष झाला.सामना जिंकताच कोल्हापूरकर छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले. बिंदू चौकापासून बाईकची रॅली ही निघाली. यावेळी प्रत्येकाच्या हातात तिरंगा होता. दरम्यान अनुचित प्रकार घडविणे म्हणून पोलीस बंदोबस्त यांना करण्यात आला होता. मात्र प्रचंड गर्दी असल्याने पोलीसच या गर्दीत अडकून पडले होते.
भारताने पाकिस्तानला धूळ चारली
पाकिस्तानने भारतापुढे विजयासाठी १४८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली आणि रोहित शर्मा मोक्याच्या क्षणी बाद झाले. पण त्यानंतर रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या यांनी दमदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. जडेजाने यावेळी ३५ धावांची दमदार खेळी साकारली.
टीम इंडियासाठी हा सामना खास ठरला. कारण साधारण एका वर्षापूर्वी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर टी-२० वर्ल्डकपच्या ग्रुप फेरीत पाकिस्तानने भारताचा १० विकेटनी पराभव केला होता. आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात भारताचा झालेला पाकिस्तानविरुद्धचा तो पहिला पराभव होता आणि त्यामुळेच जिव्हारी देखील लागला होता. काल त्याच मैदानावर भारताने आशिया कपच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेटनी पराभव करुन हिशेब चुकता केला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.