मुंबई : मुंबईच्या खार भुयारी मार्गावर एक थरार घटना घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ठाण्यातील एका ४१ वर्षीय व्यावसायिकाची त्याच्या ओळखीच्याच व्यक्तीने शुक्रवारी खार भुयारी मार्गावर भोसकून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परवेज बशीर शेख असं मृत व्यक्तीचं नाव आहे. सांताक्रूझ इथे राहणारा आरोपी सय्यद याची शेखची पत्नी शाहजहान हिच्याशी मैत्री होती. पण परवेज बशीर शेख याने पत्नीचा छळ केल्यामुळे आरोपी अकील सय्यद याने त्याला थेट मृत्यूचं दार दाखवलं.

धक्कादायक! २५ वर्षीय युवकासोबत घडला भयंकर प्रकार, भरधाव रेल्वेने तरुणालाही नेलं सोबत…
वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप मोरे म्हणाले की, “शाहजहान आणि सय्यद कॉलेजमध्ये एकत्र होते. तेव्हापासून सय्यद तिला प्रेम असल्याचं सांगून त्रास देत होता. पण शाहजहानने शेखसोबत लग्न केले आणि सय्यदनेही लग्न केले. पण तरीदेखील त्याचे एकतर्फी प्रेम थांबले नाही. तो तिचा छळ करत करतच राहिला. तो तिच्याशी लग्न करण्यासाठी तिच्या मागे लागला होता.”

”शाहजहानने त्याला वारंवार नकार दिला, कारण तिचे लग्न शेखशी झाले होते. पूर्वी सय्यदने शहाजहानला धमकी दिली होती की जर तिने त्याच्याशी लग्न केले नाही तर तो तिच्या पतीला मारून टाकेल. पण तिने त्याच्या धमक्यांकडे दुर्लक्ष केले.“शाहजहानने त्याला नकार दिला, कारण तिचे लग्न शेखशी झाले होते… पूर्वी सय्यदने शहाजहानला धमकी दिली होती की जर तिने त्याच्याशी लग्न केले नाही तर तो तिच्या पतीला मारून टाकेल. पण तिने त्याच्या धमक्यांकडे दुर्लक्ष केले.

मुंबई हादरली! अंधेरीत बॅगेत सापडला १५ वर्षीय तरुणीचा मृतदेह, शरीरावर असंख्य खुणा, घडलं तरी काय

आरोपीच्या त्रासामुळे अखेर पती शेखने सय्यदला भिडायचे ठरवले. शुक्रवारी शेखने सय्यदला खार सबवे इथे भेटण्यास सांगितले. याआधीही दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. पण शेख याला हा प्रकार संपवायचा असल्याने त्याने त्याला पुन्हा बोलावले. भेटल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला, त्यानंतर सय्यदने त्याच्यावर तीन वेळा वार केले आणि पळून गेला. स्थानिक नागरिकांनी शेख यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.

वाकोला पोलीस स्थानकांत या प्रकणात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शनिवारी शेखला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून भर चौकात हत्येचा थरार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

घटस्फोटानंतर पुन्हा त्याच्याशीच दुसरं लग्न, काही दिवसांत असं घडलं की महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here