Police arrested Mohit Kamboj in Election Period | एका निवडणुकीच्या काळात मी दिंडोशी-मालाड परिसरात होते. तेव्हा पोलिसांनी नोटांच्या बॅगेसह मोहित कंबोज यांना पकडले होते. त्यावेळी मोहित कंबोज मतदारांना पैसे वाटत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या सगळ्याविरोधात पोलिसांत धाव घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी मोहित कंबोज यांच्यावर कारवाई केली होती. परंतु, देवेंद्र फडणवीसांच्या फोनमुळे पोलिसांनी त्यांना सोडून दिले.

हायलाइट्स:
- देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे कंबोज त्यावेळी बचावले
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या सगळ्याविरोधात पोलिसांत धाव घेतली
- विद्या चव्हाण यांच्या या आरोपांना मोहित कंबोज कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार
विद्या चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, भाजपचे बरेच नेते माझ्या ओळखीचे आहेत. पण मी पूर्वी मोहित कंबोज यांना ओळखत नव्हते. एका निवडणुकीच्या काळात मी दिंडोशी-मालाड परिसरात होते. तेव्हा पोलिसांनी नोटांच्या बॅगेसह मोहित कंबोज यांना पकडले होते. त्यावेळी मोहित कंबोज मतदारांना पैसे वाटत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या सगळ्याविरोधात पोलिसांत धाव घेतली होती. तेव्हा पोलीस मोहित कंबोज यांना घेऊन पोलीस ठाण्यात आले. पण तेव्हा गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करुन मोहित कंबोज यांना सोडायला सांगितले. केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे कंबोज त्यावेळी बचावले. त्यावेळी मोहित कंबोज कोण, हे मला कळाले, असे विद्या चव्हाण यांनी म्हटले. आता विद्या चव्हाण यांच्या या आरोपांना मोहित कंबोज कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मोहित कंबोज यांचा विद्या चव्हाणांना इशारा
विद्या चव्हाण यांनी शनिवारी बिल्किस बानो प्रकरणावरुन केंद्र सरकारवर टीका करताना याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. यानंतर मोहित कंबोज यांनी दोन ट्विटस केली होती. यापैकी पहिल्या ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी ‘विद्याताई चव्हाणजी को जय श्रीराम’ असे म्हटले आहे. तासाभरातच कंबोज यांनी आणखी एक ट्विट केले. यामध्ये कंबोज यांनी विद्या चव्हाण यांचा उल्लेख केला नसला तरी इशाऱ्याचा रोख विद्या चव्हाण यांच्या दिशेनेच असल्याची चर्चा आहे. या ट्विटमध्ये कंबोज यांनी म्हटले आहे की, लगाम दिसत नसला तरी तोंडावर तो असला पाहिजे. विनाकारण आमच्याशी वाद उकरून काढलात तर मग तयार राहा. हा फक्त एक ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे, असे सूचक वक्तव्य मोहित कंबोज यांनी केले होते. त्यामुळे आता मोहित कंबोज आगामी काळात कोणता खळबळजनक खुलासा किंवा कोणते सनसनाटी प्रकरण उकरून काढणार, असल्याची चर्चा रंगली होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.