दुबई: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि प्रमुख फलंदाज विराट कोहलीनं विश्रांतीनंतर संघात पुनरागमन केलं. इंग्लंड दौऱ्यानंतर विराटला विश्रांती देण्यात आली होती. वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्ध विराटला आराम देण्यात आला होता. आता दुबईत होत असलेल्या आशिया कपमध्ये विराट कोहली खेळत आहे. काल झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट मैदानावर उतरला.

पाकिस्तानविरुद्ध भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षणावेळी एक बाब प्रकर्षानं दिसून आली. पाकिस्तानी संघ फलंदाजी करत असताना विराट आणि रोहित एकमेकांच्या आसपासही दिसले नाहीत. विराट कोहली क्षेत्ररक्षण करत असताना स्वत:ला पूर्णपणे झोकून देतो. त्याची चपळाई क्रिकेट चाहत्यांनी अनेकदा पाहिली आहे. त्याचा फिटनेस जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षणात वाघ असलेल्या विराटचा रोहितनं कर्णधार म्हणून मोठ्या खुबीनं वापर केला.
भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, शरद पवारांच्या आनंद पोटात माईना, खास सेलिब्रेशन, Video पाहाच
रोहित शर्मा स्वत: ३० यार्डच्या वर्तुळात क्षेत्ररक्षण करत होता. त्याचवेळी विराट सीमारेषेवर तैनात होता. संघाला याचा फायदा झाला. विराटनं अनेकदा उत्तम क्षेत्ररक्षण करत संघासाठी धावा वाचवल्या. त्यामुळे भारताला १५० पेक्षा धावांचं लक्ष्य मिळालं. क्षेत्ररक्षणावेळी विराटनं वाचवलेल्या धावा संघांसाठी महत्त्वाच्या ठरल्या.

भारतीय संघ १४८ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरला. त्यावेळी रोहित आणि विराटनं दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागिदारी रचली. संघाची केवळ एक धाव झाली असताना सलामीवीर के. एल. राहुल माघारी परतल्यावर आजी-माजी कर्णधारांनी डाव सावरला. भारताकडून सर्वाधिक धावा विराटनं केल्या. त्यानं ३५ धावांची खेळी केली. त्यात ३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here