BJP and MNS possible alliance in BMC Election 2022 | आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठींवर सर्वांचे लक्ष आहे. अशातच आता राज ठाकरे हे पहिल्यांदा आपल्या घरातून बाहेर पडून दुसऱ्य कोणाच्या घरी गेले आहेत. आतापर्यंत भाजपचे सर्व नेते किंवा अन्य लोक हे शिवतीर्थ येथे येऊन राज ठाकरे यांची भेट घ्यायचे.

हायलाइट्स:
- राज ठाकरे हे अनेक दिवसांनी स्वत:च्या घराबाहेर पडून एखाद्या राजकीय नेत्याच्या भेटीसाठी गेले आहेत
- त्यांच्या या कृतीचे अनेक अर्थ काढले जात आहेत
राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याने यामध्ये राजकीय मुद्द्यांवर नक्कीच चर्चा झाली असावी, असा अंदाज आहे. त्यामुळे या भेटीनंतर मनसे आणि भाजप एखादी मोठी घोषणा करणार का, हे पाहावे लागेल. त्यामुळे हे दोन्ही नेते याबाबत काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पहिल्यांदाच गणपती आणला जाणार आहे. याचे निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे फडणवीसांच्या बंगल्यावर गेले असावेत, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. राज ठाकरे हे अलीकडच्या काळात सातत्याने भाजपच्या हिंदुत्त्वाच्या मुद्द्याला पुरक भूमिका घेताना दिसत आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठींवर सर्वांचे लक्ष आहे. अशातच आता राज ठाकरे हे पहिल्यांदा आपल्या घरातून बाहेर पडून दुसऱ्य कोणाच्या घरी गेले आहेत. आतापर्यंत भाजपचे सर्व नेते किंवा अन्य लोक हे शिवतीर्थ येथे येऊन राज ठाकरे यांची भेट घ्यायचे. मात्र, आज राज ठाकरे हे अनेक दिवसांनी स्वत:च्या घराबाहेर पडून एखाद्या राजकीय नेत्याच्या भेटीसाठी गेले आहेत. त्यांच्या या कृतीचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
राज ठाकरे यांनी अलीकडच्या काळात प्रखर हिंदुत्त्वाची भूमिका सातत्याने लावून धरली आहे. या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. शरद पवार हे कशाप्रकारे नास्तिक आहेत आणि त्यांची संपूर्ण विचारसरणी आणि निर्णयप्रक्रिया त्याच अनुषंगाने आहे, असे राज ठाकरे यांनी मध्यंतरी सांगितले होते. राज ठाकरे यांच्या वक्तृत्व शैलीमुळे ते हे सर्व मुद्दे लोकांसमोर प्रभावीपणे मांडतात. याचा फायदा कुठेतरी भाजपला मिळू शकतो. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावरील भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.