भंडारा : सकाळी चहा करायला सिलेंडरचा रेगुलेटर सुरू केला आणि थोड्याच वेळात स्वयंपाक खोलीत आगीचा भडका उडाला. यात तीन लोक भाजून जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील शुक्रवारी वार्ड येथे घडली. जखमींवर उपचार सुरू असून पोलिसांत याची नोंद घेण्यात आली आहे. पवनी येथील शुक्रवारी वार्ड निवासी लेकराम रामचंद्र ढेंगरे यांच्या घरी भावना इंडेन गॅस एजेंसीचा सिलेंडर असून यात नेहमी लीकेज असलेल्या सिलेंडरच्या तक्रारी असतात. दोन दिवसांपूर्वी लेखराम यांनी लीकेजची तक्रार एजेंसीला केली असता एजेंसी मधुर इंदूरकर नामक व्यक्ती आला आणि लीकेज नसल्याचे सांगितले. त्यानंतर आज सकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान लेकराम यांनी चहा बनविण्यासाठी रेगुलेटर सुरू केला. शेगडी पेटवण्याकरिता लाइटर चालवले असता स्वयंपाक खोलीत आगीचा भडका उडाला यात लेकराम भाजले गेले.