Fire in Mumbai | आगीच्या ज्वाळा जमिनीतून बाहेर निघत होत्या. येथून काही अंतरावरच एक पेट्रोलपंप आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. काहीवेळापूर्वीच अग्निशमन दलाचे कर्मचारी याठिकाणी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, संपूर्ण गॅसच्या पाईलपाईनला आग लागल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा संपूर्ण परिसर खाली करण्यात आली आहे.

 

Mahnanagar gas pipeline fire
महानगर गॅस
मुंबई: परळ परिसरात महानगर गॅसच्या पाईपलाईनमधून वायूगळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या वायूगळतीमुळे पाईपलाईन असलेल्या भागातील रस्त्यावर आग लागली. आगीच्या ज्वाळा जमिनीतून बाहेर निघत होत्या. येथून काही अंतरावरच एक पेट्रोलपंप आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. काहीवेळापूर्वीच अग्निशमन दलाचे कर्मचारी याठिकाणी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, संपूर्ण गॅसच्या पाईलपाईनला आग लागल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा संपूर्ण परिसर खाली करण्यात आली आहे.

हा परिसर अत्यंत वर्दळीचा आहे. गॅस पाईपलाईनला आग लागल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य पसरलेले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल होत त्यांनी मदतकार्य सुरु केले. सुरुवातीला अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाईपलाईनमधून वायूगळती सुरु असल्याने ही आग विझताना दिसत नाही. अग्निशमन दलाचे जवान आपला जीव धोक्यात घालून पाईलपाईनजवळ जाऊन आग विझवताना दिसत आहे. ही आग आणखी भडकू नये, यासाठी त्यावर सातत्याने पाण्याचा मारा सुरु आहे. याठिकाणी आता फोम टँकर आणण्यात आला आहे. पाण्याने आग न विझल्यास फोमचा वापर करण्यात येईल.

महानगर गॅसचा निष्काळजीपणा

सुरुवातीला याठिकाणी आगीच्या ठिणग्या पडत होत्या. त्यानंतर आग चांगलीच भडकली. आग लागल्यानंतर अग्निशमन दल याठिकाणी तातडीने दाखल झाले. वायूपुरवठा बंद न झाल्याने पाण्याचा जोरदार फवारा मारूनही ही आग विझत नव्हती. या काळात महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी याठिकाणी येणे अपेक्षित होते. परंतु, बराचवेळ उलटूनही महानगर गॅसचा कोणताही अधिकारी घटनास्थळी दाखल झालेला नव्हता. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील काही दुकानांचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच परिसर रिकामा करण्याचं आवाहन केलं जात आहे. आजूबाजूची काही दुकान बंद करण्यात आली आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here