मिळालेल्या माहितीनुसार, मृत किसन बोराडे हा तरुण आपले मित्र ऋतिक भिलारे, विक्रम वाघमारे, आदेश वाघमारे व बंटी वाघमारे या चार मित्रांसमवेत डोणे येथील तलावात पोहण्यासाठी गेला होता. काही वेळ पोहल्यानंतर त्याला पाण्यातील गाळाचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्याचे पाय गाळात रूतत चालले होते. मित्रांनी आरडा ओरडा केला मात्र तोपर्यंत त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्याच्या जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली असून मुलगा गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वन्यजीव मावळ संस्थेच्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शोधण्यात मदत करत त्यांनी एक तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह शोधण्यात यश आले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मावळ तालुक्यात पर्यटक वाहून जाण्याच्या, बुडून मृत पडण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी मावळात फिरायला येताना काळजी घ्यावी. जर पोहता येत नसेल तर पाण्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.