कुटुंबीयांनी तक्रार दिलीच नाही तर…
कुटुंबीयांवर पोलिसांचा दबाव असल्याचं समजतंय. तरीही आशिषच्या तेरवीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पोलिसात तक्रार करणार असल्याचं कुटुंबायांकडून सांगितलं जात आहे. सद्यस्थितीत या संदर्भात आम्ही काहीच बोलण्याच्या स्थितीत नाही. योग्य वेळ आल्यास आम्ही नक्की समोर येऊन, असं कुटुंबीयांनी म्हटलं आहे. तरीही कुटुंबीयांनी तक्रार दाखल करण्यास मागेपुढे केल्यास आशिषच्या व्हिडिओच्या आधारावर चौकशी होणार आहे. जे काही निष्पन्न होणार त्यानुसार कारवाई केली जाणार, असंही पोलिसांनी म्हटलं.

शिवसेना आमदार नितीन देशमुख
व्हिडिओतून या पोलिसांना धरले जबाबदार
नमस्कार, न्यायाधीश साहेब… माझं शेवटचं बयाण आहे. अकोट फैल पोलिसांनी माझी फसवणूक केली. माझ्याकडून पाच गुटख्याचे पाकीट पकडले अन् त्यांनी (पोलिसांनी) माझ्याकडून एक लाख रुपये घेतले. आणि तुझ्यावर कारवाई करत नाही, तू पैसे दे. पैसे घेतल्यानंतर सांगितलं की वरुन खूप दबाव आहे, आता तुझ्यावर कारवाई करावीच लागते, तू टेन्शन घेवू नको, तुला पोलीस कोठडी मागत नाही. अशा पद्धतीने तुझ्यावर कारवाई करतो, अशा प्रकारे दबाव आणला. नितीन सुशील, पांडे साहेब, इंगळे साहेब, असलम साहेब, तोपकर मेजर, दाते मेजर, छोटू पवार हे सर्व कर्मचारी आहे. अन् सर्व अकोट फैल पोलीस ठाण्यातील आहेत. त्यात आणखी दोघांचा समावेश असून त्यांची नावे मला आठवत नाहीत. या सर्वांनी मला दबावात घेत कारवाई केली. मी दुकानदार आहे, काही गुन्हेगार नाही. न्यायाधीश साहेब, माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. तुम्ही योग्य रीतीने कारवाई कराल. आता पोलिसांवर माझा विश्वास राहिला नाही. भांडे आणि येणकर मेजर यांना देखील हप्ते दिले. माझ्याजवळ कुठलाही मुद्देमाल सापडला नव्हता. परंतु तरीही पोलिसांनी चुकीची कारवाई केली. हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे, असा व्हिडिओ तयार करत आशिषने आत्महत्या केली होती.
Akola Crime News : लग्नाला सहा महिने, पतीसह सासरच्यांकडून छळ; विवाहित महिलेनं उचललं टोकाचं पाऊ
दरम्यान, अकोट फैल पोलीस ठाण्यात आशिष अडचुले याच्याविरुद्ध ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी कारवाई केली होती. त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. तसेच त्याच्यावर मारहाण केल्याप्रकरणात भादंवि कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल आहे. व्हिडिओमध्ये त्याने न्यायाधीशासोबतच, पोलीस आणि नागरिकांनाही शिवीगाळ केली आहे. तो व्यसनाधिन असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली आहे.