सिंधुदुर्ग: कोकणातील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना देऊ केलेली तोकडी मदत आणि मुंबईत लोकल सुरू करण्याच्या मागणीवरून भाजप नेते व राज्यसभा सदस्य यांनी आज राज्यातील ‘ ‘वर तोफ डागली. ‘ही काय चेष्टा लावलीय?’, असा संतप्त सवाल करत राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या मागणीवर आपण ठाम असल्याचे सांगितले.

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना देण्यात आलेली मदत अगदीच तुटपुंजी आहे, असे नमूद करत राणे यांनी जास्तीत जास्त मदत देण्याचा आग्रह धरला. धडकलं तेव्हा मी कोकणात होतो. या वादळाने झालेले नुकसान मी प्रत्यक्ष पाहिले आहे. सरकारने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांतील वादळग्रस्तांना जी मदत दिली आहे ती फारच तुटपुंजी आहे. या मदतीतून घराची पुनर्बांधणी तर सोडाच पण दुरुस्तीही होऊ शकणार नाही. त्यामुळे सरकारने मदतीचा पुनर्विचार करावा. राज्याची आर्थित स्थिती नाजूक असली तरी सरकारने वादळग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्याचे धोरण आखायला हवे, अशी मागणी राणे यांनी केली.

लोकल सुरू करून काय करणार?

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडून वारंवार केंद्राकडे केली जात आहे. त्यावर बोलताना सुरू करून काय करणार?, संसर्ग आणखी वाढवायचा आहे का?, असे प्रश्न राणे यांनी उपस्थित केले. राज्यात लॉकडाऊनची अपेक्षित अंमलबजावणी झाली नाही, असा आरोपही त्यांनी केला. मुंबईतील रुग्णसंख्या अजिबात कमी झालेली नाही. राज्यातही करोना बाधित रुग्णांचा आकडा प्रचंड मोठा आहे. हे आकडे लपवण्याचा प्रयत्न झालाच तर सरकार आणखी उघडं पडेल, असेही राणे म्हणाले.

राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवर ठाम

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याच्या मागणीवरही राणे यांनी टीका केली. करोना काळात विरोधी पक्षाला सामोरे जाण्याची ताकद सरकारमध्ये नसल्यानेच पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याचा दावा राणे यांनी केला. पुरवणी मागण्यांसाठी एका दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा विचार सरकार करत असेल तर ते योग्यच असल्याचेही राणे यांनी नमूद केले. राज्यातील करोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा दावा करत राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राज्यपालांकडे केली होती. या मागणीला भाजपच्या अन्य कोणत्याच नेत्याचा पाठिंबा मिळाला नव्हता. या पार्श्वभूमीवर विचारणा केली असता, मी जी मागणी केली त्यावर आजही ठाम असल्याचे राणे म्हणाले.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here