कळमनुरी विधानसभेत मागच्या वेळी काँग्रेसचे उमेदवार म्हणून संतोष टारफे तर वंचित बहुजन आघाडी कडून अजित मगर हे रिंगणात होते. या निवडणुकीत संतोष बांगर यांचा विजय झाला होता. तर मगर हे दुसऱ्या स्थानावर तर टारफे हे तिसऱ्या स्थानावर राहिले होते. आज दोघांनीही उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. मगर आणि टारफे या दोघांच्याही शिवसेनेत येण्याने संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अजित मगर आणि संतोष टारफे यांचा शिवसेनेत प्रवेश
हायलाइट्स:
- उद्धव ठाकरेंनी कंबर कसली
- हिंगोलीचा किल्ला बांधायला घेतला
- लागोपाठ ३ प्रवेशांनी बांगरांच्या अडचणी वाढल्या
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मागच्या वेळी काँग्रेसचे उमेदवार म्हणून संतोष टारफे तर वंचित बहुजन आघाडी कडून अजित मगर हे रिंगणात होते. या निवडणुकीत संतोष बांगर यांचा विजय झाला होता. मगर हे दुसऱ्या स्थानावर तर टारफे हे तिसऱ्या स्थानावर राहिले होते. काँग्रेसमधील गटबाजीमुळे टारफे मागील काही दिवसापासून नाराज होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्याकडूनही डावललं जात असल्यास आरोप टारफे यांनी केला होता. तर मगर देखील नाराज होते. आज दोघांनीही उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. मगर आणि टारफे या दोघांच्याही शिवसेनेत येण्याने संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तत्पूर्वी माजी खासदार सुभाष वानखेडे यांनीही महिनाभराआधी शिवसेनेत प्रवेश केल्याने हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद चांगलीच वाढली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पडझड झालेला शिवसेनेचा किल्ला आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा बांधायला सुरुवात केली आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर यांनी पक्षनेतृत्वाविरोधात भूमिका घेतल्याने हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडलं. आता हिंगोलीतून ठाकरेंचं वर्चस्व संपून शिंदे गटाची ताकद वाढल्याचं काही दिवस चित्र होतं. पण उद्धव ठाकरेंनी योग्य संधी साधून आज मोठा मास्टरस्ट्रोक मारलाय. बांगरांचे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी शिवसेनेत घेऊन त्यांना कुठल्याही स्थितीत अस्मान दाखविण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
An intriguing discussion is definitely worth comment. I do think that you should publish more on this subject, it may not be a taboo subject but usually people do not talk about such subjects. To the next! All the best!!