सद्या सोयाबीनचे भाव घेतले आहेत. मात्र गोल्डस्टार ग्रो इंडिया लिमिटेड ही एमआयडीसीतील कंपनी शेतकऱ्यांना रास्त भाव देत असल्याची माहिती रेणापूर तालुक्यातील मोटेगावचे रहिवासी असणाऱ्या जगदीश नरहरी सोमवंशी या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मिळाली. त्यांनी कंपनीशी संपर्क केला. विशेष म्हणजे या कंपनीतील अतिक युसुफ शेख आणि त्याच्या सोबत कल्पना सांगवीकर, यशवंत नाडे गावात येऊन जगदीश सोमवंशी यांचे ३९९०७९ किलोग्रॅम आणि त्यांचे मित्र श्रीधर रावसाहेब जाधव यांचे ६०.२४ किलोग्रॅम प्रतिक्विंटल आठ हजार रुपये दराने खरेदी केले. या दोघांना त्यांनी आयसीआयसीआय बँकचे धनादेशही दिले. मात्र, जगदीश सोमवंशी यांचे २ लाख ५५ हजार ४८९ रुपये, श्रीधर जाधव यांचे ९७ कट्टे सोयाबीनचे ३ लाख ८७ हजार ३४३ रुपये त्यांना मिळाले नाहीत. त्यांनी कंपनीशी तसेच संबंधित तिघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण ती कंपनी बंद होती. तिघेही फरार झाले होते.
आपल्यासारखीच इतर शेतकऱ्यांची आणि दोन बियाणे विक्रेत्या दुकानदारांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी लातूर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदर कंपनी आणि तिघांविरोधात तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीवरून कंपनी आणि सदर संबंधित अतिक युसुफ शेख आणि त्याच्या सोबत कल्पना सांगवीकर, यशवंत नाडे या तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उप निरीक्षक डाके अधिक तपास करीत आहेत.
फसवणूक झालेले शेतकरी
राजाराम चालूक्य – ४३ कट्टे, किंमत- १,९३,३५० रुपये,
सुरेश इंगळे – ५९ कट्टे, किंमत- १,९९,७१५ रुपये,
अमोल इंगळे – ६ कट्टे, किंमत- १,८२,५४७ रुपये,
अक्षय मुळजे – १४ कट्टे, किंमत- ५३,५७४ रुपये
ज्ञानेश्वर सोनवणे- ३७ कट्टे, किंमत- १,३९,५३१ रुपये,
कमलाबाई मुळजे- १४ कट्टे, किंमत- ५३,५७४ रुपये
साधना सोनवणे- ३३ कट्टे, किंमत- १,२८,६०० रुपये
धिरज सोनवणे- २५ कट्टे, किंमत- १,०१,५९४ रुपये
फसवणूक झालेले इतर शेतकरी
सिध्देश्वर सोमवंशी, वैजनाथ बिराजदार, सुशीलाबाई बिराजदार, नागनाथ वागण्णा, विकास नानासाहेब सूर्यवंशी, विकास सूर्यवंशी, सोपान
श्रीमंत सूर्यवंशी, सोपान सूर्यवंशी, शिवाजी शेषराव पाटील, सूर्यकांत भिमराव घोडके, सुर्यकांत घोडके, गुंडू रामराव ढोले, अलका दत्तात्रय बामणीकर, संगमेश स्वामी, सुरेखा स्वामी, विवेकांनद स्वामी, राचय्या स्वामी, किरण स्वामी, महादय्या स्वामी, शशीकांत सोनवणे, निकेतन घोडके, आकाश स्वामी, सोमनाथ स्वामी, ज्ञानोबा लक्ष्मण गुट्टे,प्रेमकलाबाई ज्ञानोबा गुट्टे, प्रशांत महादेव डिगे, रामेश्वर श्रीधर चव्हाण, सुभाष पांडूरंग गावडे, तुकाराम धोंडीराम कुंटे अशा शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि तूर खरेदी करून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे.
An intriguing discussion is definitely worth comment. I do think that you should publish more on this subject, it may not be a taboo subject but usually people do not talk about such subjects. To the next! All the best!!