Authored by किशोर पाटील | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Aug 29, 2022, 6:11 PM
Jalgaon Crime News : जळगावातील मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गावर महिलेची हत्या करून प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये फेकून देण्यात आला आहे. हत्या का झाली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

हायलाइट्स:
- मोठ्या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
- मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गावर पूलाच्या खाली आढळला मृतदेह
- महिलेची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याची प्राथमिक माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर ते बर्हाणपूर महामाार्गवर संत मुक्ताई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ असणार्या पुलाच्या खालील बाजूस सोमवारी सकाळी एका महिलाचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. विशेष बाब म्हणजे या महिलेची अतिशय क्रूरपणे हत्या केल्यानंतर त्या महिलेचा मृतदेह हा जाड प्लॅस्टीकच्या बॅगमध्ये टाकून तिथे टाकल्याचे आढळून आल्याचंही समोर आलं आहे. संबंधित महिलेची ओळख पटली नसून तिचे वय साधारणपणे ४० ते ४५ वर्षाच्या दरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलाच्या खालच्या बाजूला असलेला मृतदेह हा वर काढण्याचे प्रयत्न सुरू असून या प्रकरणी पोलिसांची पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. परिसरात हे वृत्त वार्यासारखे पसरताच एकच खळबळ उडाली. अनेक ग्रामस्थांनी पुलाकडे धाव घेतली गर्दी केल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात हत्येच्या घटना सातत्याने घडत आहेत. यात जळगाव शहरात दोन हत्या झाल्या असून यावल तालुक्यात दोन, चाळीसगावात एक हत्या झाली आहे. या पाठोपाठ आता मुक्ताईनगर तालुक्यात महिलेची हत्या झाल्याने जळगाव जिल्हा हादरला आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
An intriguing discussion is definitely worth comment. I do think that you should publish more on this subject, it may not be a taboo subject but usually people do not talk about such subjects. To the next! All the best!!