आपल्या जिल्ह्याला विचारांचा मोठा वारसा आहे, या जिल्ह्याने आपल्या विवेकाचा वापर करून अनेकदा चांगल्या लोकांना संधी दिली आहे. येणाऱ्या काळातही काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण वर आणण्याचा प्रयत्न करू. सध्या राज्यभरात सभासदांची नोंदणी केली जात आहे. जिल्ह्यात जास्तीतजास्त सभासदाची नोंद होईल याची खबरदारी घ्या. सर्व पक्षांपेक्षा जास्त सभासद आपल्या पक्षाचे असले पाहिजे. पक्षाच्या शिस्तेचे पालन प्रत्येकाने करायला पाहिजे. मला हे सत्कार, हारतुरे, फेटे यात काहीच रस नाही. आपली पार्टी वाढण्यात मला रस आहे. आपण सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
पुढे ते म्हणाले, “राजकारणात वेळ फार महत्त्वाचा, लोक राजकारणात आयुष्य घालवतात त्यामुळे वेळेचा उपयोग करून पक्षाच्या आणि आपल्या प्रगतीचा विचार आपण करायला हवा. लोकांना विषय समजून सांगा तरच लोकांचे प्रबोधन होईल आणि एक जन आंदोलन उभे राहील. येणाऱ्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकायला हवा यासाठी प्रयत्न करा. आपल्यात अचूक नियोजन पाहिजे, एकसंधपणा पाहिजे तर आपल्याला कोणीही पराजित करू शकत नाही”
“संजय खोडके यांनी या शहरात चांगल्याप्रकारे पक्ष बांधला आहे. लोकांसोबत संपर्क ठेवणे फार महत्त्वाचे आहे. लोकांसाठी सदैव उपलब्ध राहिले पाहिजे. संजय खोडके हे आपल्या बाईकवर फिरत असताना लोकांशी संवाद साधतात, त्यांच्या अडचणी असतील तर ते सोडवतात”, अशा शब्दात जयंत पाटील यांनी संजय खोडके यांच्या कामाचे कौतुक केले.