लखनऊ: रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या पालकांच्या शेजारून पळवून नेण्यात आलेलं सात महिन्यांचं बाळ भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या घरात सापडलं आहे. मथुरा रेल्वे स्टेशनवरून गेल्या आठवड्यात एक बाळ पळवून नेण्यात आलं होतं. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. आता हे बाळ १०० किलोमीटरवर असलेल्या फिरोझाबादमध्ये सापडलं आहे. विशेष म्हणजे चोरी करण्यात आलेलं बाळ भाजपच्या नगरसेविकाच्या घरात सापडलं. त्यामुळे बाळांची चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

भाजपच्या नगरसेविका विनिता अग्रवाल आणि त्यांच्या पतीनं दोन डॉक्टरांकडून बाळ खरेदी केल्याची माहिती उघडकीस आली. या बाळासाठी दोघांनी १.८ लाख रुपये मोजले. अग्रवाल दाम्पत्याला एक मुलगी आहे. पण त्यांना एक मुलगा हवा होता. दाम्पत्याला बाळाची विक्री करणारे डॉक्टर्स एका मोठ्या टोळीचा भाग आहेत.
हात विजेच्या तारेनं बांधले, झाडूनं स्विच ऑन; आत्महत्येसाठी तरुणाचा वेदनादायी मार्ग
बाळाची चोरी प्रकरणी एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये रेल्वे स्टेशनवरून बाळाला चोरताना सीसीटीव्हीत कैद झालेल्या इसमाचाही समावेश आहे. या संपूर्ण प्रकरणाची उकल केल्यानंतर मथुरा पोलिसांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी काही व्हिडीओ दाखवले. पहिल्या व्हिडीओमध्ये पोलीस बाळाला त्याच्या आईकडे सुपूर्द करताना दिसले. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांकडून ५०० रुपयांच्या नोटा जप्त केल्याचं दिसलं.
भीषण! भयंकर!! कारवरील नियंत्रण सुटलं; पाच सेकंदांत पाच वेळा उलटली; झुडूपात जाऊन पडली
दीप कुमार नावाच्या व्यक्तीनं रेल्वे स्टेशनवरून बाळ चोरलं होतं. दोन डॉक्टर चालवत असलेल्या टोळीचा तो एक भाग आहे. या दोन डॉक्टरांचं शेजारच्या हाथरस जिल्ह्यात एक रुग्णालयदेखील आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी मोहम्मद मुश्ताक यांनी दिली. या टोळीत काही आरोग्य कर्मचाऱ्यांचादेखील समावेश आहे. ज्या घरात चोरी झालेलं बाळ सापडलं, त्या घरातल्या व्यक्तींची आम्ही चौकशी केली. त्या दाम्पत्याला एक मुलगी आहे. त्यांना एक मुलगा हवा होता. त्यासाठी त्यांनी हा व्यवहार केल्याची माहिती मिळाली, असं मुश्ताक म्हणाले. अटक करण्यात आलेल्या भाजप नगरसेविकेनं आणि भाजपनं अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here