Sai Resort Will Demolish | माजी परिवहन मंत्री व तत्कालीन पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर आरोप असलेल्या मुरुड येथील साई रिसॉर्ट व सी कोच रिसॉर्ट तोडण्याचे आदेश रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा कोस्टल झोन मॉनिटरिंग कमिटी (DCZMC) यांना आज २५ ऑगस्ट रोजी गुरुवारी राज्य शासनाने दिले होते.

हायलाइट्स:
- किरीट सोमय्या हे दोन दिवसांपूर्वीच येथे हातोडा घेऊन दाखल झाले होते
- परबांवर आरोप असलेले ते रिसॉर्ट होणार जमीनदोस्त
- हातोडा चालवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम करणार नियोजन
दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट हे अनाधिकृत असून ते माजी मंत्री अनिल परबांचे असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेकदा केला होता. या रिसॉर्टवर कारवाई करावी अशी मागणी करून त्यांनी केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या कारवाई प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने शिक्कामोर्तब केल्यावर आता या प्रक्रियेला गती मिळाली आहे. जिल्हा प्रशासनाने याचे नियोजन केले असून यासाठी लवकरच हा मुहूर्त ठरणार असल्याचे आता निश्चित आहे.
नोएडातील ट्वीन्स टॉवरप्रमाणे अनिल परबांचा साई रिसॉर्ट उद्ध्द्वस्त करावा, किरीट सोमय्यांची मागणी
रिसॉर्टबद्दल सोमवारी जिल्हाधिकारी मॉनिटरिंगची कमिटीचे अधिकारी आणि शासकीय पद्धतीने हे रिसॉर्ट कार्यालयात बैठक पार पडली आहे. बैठकीला जिल्हास्तरीय कोस्टल झोन कमिटीचे अधिकारी उपस्थित होते. यासंबंधी कसे नियोजन असावे याबाबतच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या नियमांची अंमलबजावणी करून पुढील कारवाई केली जाणार आहे. केंद्राच्या सूचनानंतर रिसॉर्ट पाडण्यासंदर्भातील आराखडा तयार करण्यात आला आहे.
भाजपाचे किरीट सोमय्या हे दोन दिवसांपूर्वीच येथे हातोडा घेऊन दाखल झाले होते. त्यानंतर सोमवारी प्रशासनाची बैठक पार पडली आहे. हे अनाधिकृत रिसॉर्ट जमीनदोस्त होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवासांपासून वादाच्या भोवऱ्यात असलेले हे साई रिसॉर्ट व सी कॉच जमीनदोस्त होणार आहे.
महाविकास आघाडीच्या घोटाळयांचे स्मारक पडणार- किरीट सोमय्या
या दिवाळीपर्यंत महाविकास आघाडी सरकारच्या घोटाळयांचे हे स्मारक जमीनदोस्त झालेले असेल. जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांनी ही तांत्रिक प्रक्रिया सुरू केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागा याचे नियोजन करताना नोवेडा मधील ट्विन टॉवर तुटला त्याप्रमाणेच अनिल परब यांचेही रिसॉर्ट तुटेल अशी प्रतिक्रिया तक्रारदार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. मला मागच्या दौऱ्यात दापोलीत अडवून गुन्हा दाखल करणाऱ्या दापोली पोलीसांना आता अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करावाच लागेल. तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्या आदेशानुसार मागच्या दौऱ्यात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आम्हाला दिलेली वागणूक आम्ही विसरलो नाही, हे लक्षात ठेवा अशीही आठवण सोमय्या यांनी दापोली शनिवारी दौऱ्यावर करुन दिली होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.