वसई-विरार महापालिकेच्या रुग्णालयात एका रुग्णाचा मृतदेह तब्बल १२ तास अन्य रुग्णांच्या शेजारी ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने रुग्णालयातील व्हिडीओ काढून हा प्रकार उघडकीस आणला आहे.

पालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, संबंधित व्यक्ती बेवारस असल्याने पोलिस हा मृतदेह ताब्यात घेणार होते. पोलिसांकडून हा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी येत असल्याचा निरोप दिवसभरात अनेकदा मिळाल्याने मृतदेह तिथून हलवण्यात आला नाही. मात्र २७ तारखेचा पूर्ण दिवस या प्रतीक्षेत गेला. प्रत्यक्षात पोलिसांनी २७ तारखेला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात येऊन मृतदेह ताब्यात घेतला. या कारणामुळे मृतदेह त्याच जागी राहिल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.