Maharashtra Politics | राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याने यामध्ये राजकीय मुद्द्यांवर नक्कीच चर्चा झाली असावी, असा अंदाज आहे. त्यामुळे या भेटीनंतर मनसे आणि भाजप एखादी मोठी घोषणा करणार का, हे पाहावे लागेल. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोमवारच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

हायलाइट्स:
- चंद्रशेखर बावनकुळे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी जाणार आहेत
- राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्र अचानक वाढले
- राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोमवारच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राज ठाकरे हे अलीकडच्या काळात सातत्याने भाजपला पुरक भूमिका घेताना दिसत आहेत. राज्यसभा निवडणूक, विधानपरिषद निवडणूक आणि त्यानंतर विश्वासदर्शक ठरावावेळी राज ठाकरेय यांच्या मनसेने भाजपच्या पारड्यात मत टाकले होते. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता आहे.
मध्यंतरी राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते काही काळा राजकारणापासून दूर होते. मात्र, आता ते नव्या जोमाने कामाला लागले आहेत. एरवी कोणताही राजकीय नेता हा राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जातो. पण सोमवारी राज ठाकरे हेच सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. राज ठाकरे यांच्या या कृतीची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा पुरता बिमोड करायचा झाल्यास भाजपला मनसेची मदत होऊ शकते. अलीकडच्या काळात राज ठाकरे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून लक्ष्य करून आपली उपयुक्तता दाखवून दिली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मनसेशी युती केल्यास भाजपला फायदा होऊ शकतो, असा राजकीय जाणकारांचा होरा आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.