ठाणे विभागाची ठाणे २ आगाराची बस क्र. MH 09 EM 3530 ही खेड ते ठाणे (गणपती जादा) मार्गावर धावत असताना पोलादपूर येथे स्टेट बँकेसमोर आली असता समोरून येणारी मारुती सुझुकी इरटिगा क्र. MH 05 CV 3299 वरील चालकाने चुकीच्या बाजूने वाहन चालवत बसला समोरील बाजूस धडक बसली आणि अपघात झाला. सदर अपघातात प्रवासी अथवा चालक/वाहक यांना कोणतीही दुखापत झाली नसून दुसऱ्या वाहनातील ३ व्यक्ती जखमी झाले असून २ व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदर अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस स्टेशन येथे करण्यात आलेली आहे.
मेट्रो ३ च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा, नव्या मेट्रोचं नवं रुप, कुठल्या मार्गावरुन धावणार?या अपघाताची माहिती समजतात स्थानिक नागरिकांसह घटनास्थळी नरवीर रेस्क्यू टीमने धाव घेतली. परिसरातील नागरिकही घटनास्थळी धावून आले आणि तात्काळ मदतकार्य सुरू केले. यातील जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पोलादपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्याना पुढील उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे. हा अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलादपूर पोलिस करीत आहेत.
मयतांची नावे :-
जयवंत सावंत (वय ६०) अंबरनाथ
किरण घागे (वय २८) घाटकोपर
जखमींचे नावे :-
गिरीश सावंत ( वय ३४) अंबरनाथ
अमित भीतळे ( वय ३०) बदलापूर
जयश्री सावंत ( वय ५६) अंबरनाथ