नवी दिल्ली : देशभरात वाढत्या महागाईच्या काळात मसाल्यांचे दर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भारतीय जेवण हिंगाशिवाय अपूर्ण आहे. गेल्या अनेक काळापासून भारतातील प्रत्येक स्वयंपाकघरात हिंगाचा वापर केला जात आहे. पण अजूनही भारतात हिंगाचे उत्पादन सुरू झालेले नाही. यामागे एक प्रमुख कारण म्हणजे हिंगाची रोपे अत्यंत थंड आणि कोरड्या हवामानातच वाढतात. त्यामुळे अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, इराण आणि कझाकिस्तानचे हवामान हिंगाच्या उत्पादनास अनुकूल आहे.

अफगाणिस्तानातून येणाऱ्या हिंगाच्या आयातीत मोठी घट झाली आहे. मात्र, हिंगाची आयात पुन्हा सुरू झाली आहे पण त्याची मात्रा मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाही. भारतात वापरल्या जाणार्‍या हिंगाच्या दोन सर्वात सामान्य प्रकार – लाल आणि पांढरा- आहेत. पांढरं हिंग मूळचा अफगाणिस्तानचा असल्याचे म्हटले जाते, जो की पाण्यात विरघळणारा जातो. तसेच इतर देशांत आढळणारे हिंग तेलात विरघळणारे आहे.

एलपीजी-सीएनजीचे दर बदलणार, सर्वसामान्यांना दिलासा की झटका; जाणून घ्या कशी ठरवली जाते किंमत
हिंगासाठी अफगाणिस्तानवर अवलंबित्व
भारत आपल्या एकूण गरजेपैकी ८५ टक्के हिंग अफगाणिस्तानातून आयात करतो. याशिवाय उझबेकिस्तान, इराण आणि कझाकिस्तानमधून थोड्या प्रमाणात हिंगाची आयात केली जाते. आता हिंग महागल्याच्या बातम्यांबद्दल बोलायचे तर गेल्या दोन वर्षांत हिंगाच्या किमतीत सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात कमाल भाव वाढला आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून हिंगाची आयात कमी झाली आहे. तालिबानने काबूलमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर एका वर्षानंतर भारताचा दक्षिण आशियाई शेजारी देशांसोबतचा व्यापार हळूहळू रुळावर येत आहे.

भारतातून अफगाणिस्तानला होणारी निर्यात जूनमधील ४८ दशलक्ष डॉलरवरून गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये २४ दशलक्ष डॉलरवर आली आहे. त्याचबरोबर आयातीचे आकडे दर महिन्याला वर-खाली होत आहेत. जूनमध्ये भारताने अफगाणिस्तानमधून २७९ दशलक्ष डॉलर आयात केले, त्यापैकी ६७ टक्के हिंग आयात केली गेली.

भारताचा GDP वाढीचा दर घसरणार की वाढणार, अर्थमंत्री सीतारमणांनी दिले स्पष्ट उत्तर
मसाल्यांच्या किंमती वाढल्या
गेल्या दोन वर्षांत मसाल्याच्या किमतीत सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर बऱ्याच मसाल्यांच्या किंमतींनी गेल्या काही बरसात दुहेरी आकडे गाठली आहे. ब्रँडेड कोथिंबिरीच्या किमती एका वर्षापूर्वीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये १६.९ टक्क्यांनी वाढल्या आहेत. रिटेल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म बिजोमने दिलेल्या माहितीनुसार गरम मसाला देखील १५.६ टक्क्यांनी महाग झाला आहे.

महागाईच्या झळांनी करपला ‘वरणभात’; तांदळाच्या दरांत महिनाभरात १५ ते २० रुपयांची वाढ
जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ
जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही गेल्या वर्षभरात माफक प्रमाणात वाढ झाली आहे. ब्रँडेड दूध ५.४ टक्के आणि ब्रेड १२.३ टक्क्यांनी महागले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अमूल आणि ITC सारख्या कंपन्यांनी दुधाच्या दरात प्रति लिटरमागे २ रुपयांची वाढ केली होती. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या नोंदीनुसार या वर्षी जुलैमध्ये संपूर्ण भारतात घाऊक दुधाच्या किमती वार्षिक ६ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

लोणी, तूप, बासमती तांदळाचे भावही वाढत आहेत. ब्रँडेड बासमती तांदळाच्या किमतीत एक वर्षापूर्वीच्या तुलनेत ३२ टक्क्यांनी अधिक वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. तर लोणी ७.७ टक्क्यांनी, तर तूप ५.३ टक्क्यांनी महागले आहे.

दैनंदिन वापराच्या वस्तूंचीही दरवाढ
गेल्या वर्षीच्या तुलनेत ब्रँडेड आंघोळीचा साबण १५ टक्के महाग झाला आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर आणि गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स सारख्या एफएमसीजी कंपन्यांनी साबणांच्या किमती वाढवून स्वत:ला वाचवले आहे. ब्रँडेड डिटर्जंटच्या किमतीही गेल्या वर्षभरात ९.७ टक्क्यांनी वाढल्या आहेत. बिझोमच्या आकडेवारीनुसार, फ्लोअर क्लीनिंग उत्पादने १२.३ टक्क्यांनी महाग झाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here