पुणे : आमदार शहाजी बाप्पू पाटील यांनी पुन्हा एकदा त्यांच्या खास शैलीत पुण्यात तजफदार भाषण केलं आहे. पुण्यात एका कार्यक्रमात पाटील म्हणाले की ‘आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ओके, देवेंद्र फडणवीस ओके आणि भविष्यात रुपाली ताई तुमचंसुद्धा चांगलं होऊद्या ओके’. त्यांचा हा डायलॉग येताच कार्यक्रमामध्ये हशा पिकला.
यावेळी पाटील म्हणाले, ‘आम्ही सद्या गुहाटीत आहे. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल सगळं ओके. काय आवडू नाय आवडू आमचा एकनाथ साहेब मुख्यमंत्री मग आमचे फडणवीस ओके. ताई भविष्यात तुमचंही चांगलं होऊद्या ओके’.