मुंबई : बाप्पाच्या आगमनाची वाट दरवर्षी आपण सगळेच अगदी त्याला निरोप दिल्यापासून बघत असतो. तो कधीच आपल्याला सोडून जाऊ नये अशी आपली इच्छा असते. म्हणून आपण म्हणतो देखील पुढच्या वर्षी लवकर या! आता सगळीकडेच बाप्पाच्या आगमनाची तयारी मोठ्या उत्साहात, थाटामाटात सुरू आहे. आतुरतेने सगळेच श्री गणेश आगमनाची वाट बघत आहेत.

सजावटीची तयारी, रोषणाई, बाप्पासाठी गोडधोड पदार्थ सगळ्याची तयारी सुरू झाली आहे. कलर्स मराठीवरील मालिकांमध्ये गणरायाचं धुमधडाक्यात आगमन होणार आहे. भाग्य दिले तू मला, राजा रानीची गं जोडी, जीव माझा गुंतला, सुंदरा मनामध्ये भरली या मालिकांमध्ये विशेष भाग बघायला मिळणार आहे. सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमात सूरवीर गणरायासाठी सुरेल गाणी सादर करणार आहेत.

मालिकांमध्ये गणपती आगमन

भाग्य दिले तू मला मालिकेत रत्नमाला मोहितेंच्या घरी बाप्पाचं आगमन होणार आहे. रत्नमाला यांना बाप्पाचा संकेत मिळणार आहे. कावेरी, राज आणि घरातले सगळे मिळून सजावटीची तयारी करताना दिसणार आहेत. रत्नमाला, कावेरी खास बाप्पासाठी मोदक बनवणार आहेत.

हा अभिनेता होता आलिया भट्टचा पहिला क्रश, तुम्ही ओळखलं का?

माझा गुंतला मालिकेत खानविलकरांच्या घरात गणरायाचे मोठ्या धुमधडाक्यात आगमन होणार आहे. सगळे मिळून बाप्पाची पूजा करणार आहेत, नैवेद्य दाखवला जाणार आहे. मल्हार – अंतरा मिळून आरती करणार आहेत. पण याच दरम्यान घरात मेघ देखील घरात येणार आहे. आता मेघच्या येण्याने कोणते संकट येईल, हे लवकरच कळेल.

गणेशोत्सवाची धूम

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत लतिका आणि अभी मिळून गणरायाची स्थापना करणार आहेत. अभिलाषा अभिमन्यूच्या विरोधात काही तरी कट कारस्थान करताना दिसणार आहे. आता हे आलेलं विघ्न कसं दूर होईल? काय आहे नक्की अभिलाषाच्या मनामध्ये? हे मालिकेच्या पुढच्या भागात बघायला मिळेल.

अखेर आशुतोषच्या संगीत विद्यालयाचं उद्घाटन झालं जोशात, या Video मध्ये दिसतील सर्व पाहुणे

आनंदी आणि चिंगीनं साकारली बाप्पाची मूर्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here