औरंगाबाद :शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती झाली. याच युतीवरून औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी खरमरीत टीका केली आहे. जे कमजोर असतात त्यांना लाचारी म्हणून कुबड्याची गरज असते, असा टोला खासदार जलील यांनी शिवसेनेला लागवला आहे. तर, आमची ताकद खोप मोठी असून सर्व पक्षांनी आगामी निवडणुकीत एक एक करून या, असे खुले आवाहन ही त्यांनी केले आहे. (aimim mp imtiaz jaleel criticizes shiv sena over alliance with sambhaji brigade)

खासदार इम्तियाज जलील हे पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर शिवसेनेच्या ४० आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दर्शवला. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आहे. तब्बल ४० आमदार सोडून गेल्यावर शिवसेना कमकुवत झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांनी राजकीय खेळी खेळत आक्रमक संघटना म्हणून परिचित असलेल्या संभाजी ब्रिगेडशी युती केल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते.

Sandipan Bhumare : सावे-सत्तार मागे, भुमरे सबसे आगे, औरंगाबादचे पालकमंत्रिपद निश्चित?
येत्या मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने औरंगाबदेत शिवसेनेला या युतीचा फायदा होऊ शकतो अशी चर्चा आहे. या युतीवरून अनेक राजकीय नेत्यांकडून टीका सुरू आहेत. तर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना याच युतीवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जलील यांनी शिवसेनेला डीवचले आहे. जे कमजोर असतात त्यांना लाचारी म्हणून कुबड्याची गरज असते असा टोला खासदार जलील यांनी लागावला आहे. आम्हाला युतीची गरज नाही, आम्ही एकटेच सर्वावर भारी असून सर्व पक्षांनी एक एक करून औरंगाबदेत या असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
विवाहित प्रेयसीच्या मुलाला अनामुष मारहाण, औरंगाबादेत जवानाने चिमुकल्याचा जीव घेतला
राष्ट्रवादी पक्ष हिंदुत्वाकडे जातोय

लोकसभेत शहराच्या नामकरांचा मुद्दा अजून झालेला नाही. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसापूर्वी ट्विट करून शहराचा छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख केला होता. मीही, ताई जरा थांबा असे ट्वीट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता सौम्य हिंदुत्वाकडे जात असल्यामुळे मुस्लिम कार्यकर्ते संभ्रमात आहेत, असेही खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

गावची बैठक सुरू असताना घडले भलतेच; तंटामुक्त अध्यक्षालाच केली बेदम मारहाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here