न्यूयॉर्क : जगभरात गुंतवणूक गुरू म्हणून प्रसिद्ध असलेले वॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस आहे. जगातील कोट्यवधी लोक शेअर बाजारातून पैसे कमविण्यासाठी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा अवलंब करतात. गुंतवणुकीबाबत त्यांनी केलेले मार्गदर्शन अतिशय प्रभावी ठरते. बफे यांनी वेळोवेळी सार्वजनिक मंचांवर गुंतवणुकीबाबतचे त्यांचे अनुभवही सांगितले आहेत. जाणून घ्या गुंतवणूक गुरू बफेंचे 5 गुंतवणूक मंत्र…

गुंतवणुकीकडे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा
शेअर्स विकत घेतल्यानंतर एका दिवसात किंवा फार कमी वेळात विकण्यापेक्षा चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून त्यामध्ये तुमची गुंतवणूक दीर्घकाळ टिकवून ठेवणे चांगले. शेअर मार्केटमधील दीर्घकालीन गुंतवणूक शेवटी जास्त परतावा देते. परंतू त्यासाठी तुम्ही योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

अंबानींनी धाकट्या मुलाला दिली मोठी जबाबदारी, पाहा अनंत आता काय करणार

रातोरात श्रीमंत होण्याचा विचार करू नका
बाजारात लवकरात लवकर श्रीमंत होण्याची हाव तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. चांगला पोर्टफोलिओ तयार करणे ही एक लांब प्रक्रिया आहे. यासाठी खूप संयम लागतो. बाजारातून चांगल्या परताव्यासाठी तुम्ही अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी ज्यांचे व्यवसाय मॉडेल तसेच त्यांचे व्यवस्थापन चांगले आहे.

जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा फेरबदल, फक्त २४ तासात अंबानींची संपत्ती इतक्या अब्ज डॉलरनी वाढली
ध्येय ठेवून गुंतवणूक करा
ध्येयाशिवाय केलेली गुंतवणूक अनेकदा फायदेशीर नसते. तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेला पैसा हुशारीने गुंतवावा. त्या गुंतवणुकीत पैसा कसा वाढणार आहे हे समजत नसेल, तर त्यापासून दूर राहणेच बरे.

अंबानींच्या यशाचा फॉर्म्यूला; या १० नियमांवर चालते संपूर्ण रिलायन्स
वैविध्य समजून घ्या
तुमची सर्व अंडी एका टोपलीत ठेवू नका. हे सूत्र गुंतवणुकीलाही लागू केले पाहिजे. तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी असलेली रक्कम वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वितरित केली जावी. संपूर्ण पैसा डेटमध्ये किंवा इक्विटीमध्ये गुंतवू नका, सर्वांमध्ये समतोल ठेवा.

रास्त भावाने करा शेअर्सची खरेदी
एखादी कंपनी उत्तम दर्जाची उत्पादने बनवत आहे किंवा ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. वॉरन बफेट म्हणाले, एखाद्या मोठ्या कंपनीचे शेअर्स मोठ्या किंमतीला खरेदी करण्यापेक्षा चांगल्या कंपनीचे शेअर्स वाजवी किंमतीला विकत घेणे कधीही चांगले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here