police called for a bulldozer to send the woman to her in laws house: उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील हरी नगर गावातील एका महिलेला सासरी परतताना पोलिसांनी सुरक्षा पुरवली. या महिलेला तिच्या पतीनं हुंड्यावरून घराबाहेर काढलं होतं. त्यानंतर पीडित महिला अलाहाबाद उच्च न्यायालयात गेली.

प्रकरण नेमकं काय?
प्रकरण हल्दौरमधील हरीनगर गावातलं आहे. शेर सिंह नावाच्या व्यक्तीनं त्याची मुलगी नूतनचं लग्न हिंदू रितीरिवाजांनुसार रॉबिन नावाच्या तरुणाशी केलं. १ मार्च २०१७ रोजी नूतन आणि रॉबिनचा विवाह झाला. शेर सिंह यांनी त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार लग्न लावून दिलं. लग्नानंतर काही महिने आनंदात गेले. मात्र त्यानंतर त्यांच्याकडून हुंड्याची मागणी होऊ लागली.
पाच लाख रुपये आणि एक कार अशी सासरच्या मंडळींची मागणी होती. मागणी पूर्ण होत नसल्यानं रॉबिननं नूतनला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिला घराबाहेर काढलं. नूतनं बिजनौर न्यायालयात धाव घेतली. मात्र रॉबिनच्या कुटुंबानं न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर नूतननं अलाहाबाद उच्च न्यायालयात दाद मागितली. नूतन सासरीच राहील आणि तिच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांची असेल, असा आदेश न्यायालयानं दिला. त्या आदेशाची अंमलबजावणी पोलिसांनी केली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.