निशा विपीन टाक (वय २७) यांचा विवाह २०२० साली विपीन अशोकराव टाक यांच्याशी दोन्ही कुटुंबाच्या संमतीने झाला होता. विवाहामध्ये निशाच्या वडिलांनी हुंडा म्हणून २ लाख ५० हजार रुपये व संसारोपयोगी साहित्य असा खर्च केला. विवाहानंतर निशा महेंद्र नगर येथे नांदायला गेले. सुरुवातीचे काही चांगले दिवस नांदवले आणि त्यानंतर १५ सप्टेंबर २०२० विपीन व सासरची मंडळी यांनी छोटया छोटया गोष्टीवरून मानसिक, शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली.
“नवीन घर बांधकामासाठी आई वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये” असं म्हणत पती, सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ करत चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर १६ ऑक्टोबर रोजी पती विपीनने अचानक येऊन निशाला सांगितले की, “तुझ्यासोबत मला राहायचे नाही. घटस्फोट घ्यायचा आहे”, असं म्हणत कोर्टात घेऊन गेला आणि तेथे निशा यांना सोडून निघून गेला. तेव्हापासून विवाहित निशा माहेरीच राहते.
दरम्यान, १६ जून २०२२ रोजी अंदाजे रात्री नऊ वाजता निशा सासरी गेली असता तेव्हा पतीने अमानुष मारहाण केली, गळा दाबून मारून टाकतो म्हणून मला पकडले होते. या प्रकरणी विवाहितेने नानालपेठ पोलीस ठाण्यात पती विपीन अशोकराव टाक, सासू पुष्पा अशोक टाक, सासरे अशोकराव माणिकराव टाक, सचिन अशोकराव टाक, सानिका सचीन टाक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.