अक्कलकोटमधील यापूर्वीचे भाजप जिल्हाध्यक्ष
अक्कलकोटमधील आनंद तानवडे, बलभीम शिंदे, आणि शिवशरण दारफळे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. शिवशरण दारफळे हे तर दिवंगत भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे कट्टर समर्थक होते. वाजपेयी जोपर्यंत पंतप्रधान होत नाहीत, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा देखील त्यांनी केली हेाती.
भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या स्पर्धेतील इतर इच्छुकांचा पत्ता कट
सांगोला तालुक्यातील तत्कालीन भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर एका महिलेने फसवणुकीचे आरोप करत बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. श्रीकांत देशमुख यांचा बेडरुमधील आक्षेपार्ह व्हिडिओही व्हायरल झाला हेाता. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला होता. तेव्हापासून भाजपचे जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. या पदासाठी अनेकांची नावे चर्चेत होती. अनेक भाजप नेत्यांनी फिल्डिंग लावली होती. फिल्डिंग लावलेल्या नेत्यांमध्ये विजयराज डोंगरे, धैर्यशील मोहिते पाटील, संतोष पाटील, शिवाजी कांबळे यांच्या नावाचा समावेश असल्याचं बोललं जात होतं. मात्र अखेरच्या क्षणी सचिन कल्याणशेट्टी यांनी बाजी मारली आहे.